एक्स्प्लोर
Nilesh Rane : भाजप नेते निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक,नारायण राणे आणि आमदार भास्कर जाधव यांचा वाद शिगेला
Nilesh Rane : भाजप नेते निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक,नारायण राणे आणि आमदार भास्कर जाधव यांचा वाद शिगेला
भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे.
1/7

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला.
2/7

त्यावेळी ही दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे. निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होत आहे.त्या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले.
3/7

या परिसरात प्रचंड तणाव आहे, त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला.
4/7

निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी (Tali) येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली.
5/7

भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता पुत्रांवर तुफान टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागमध्ये आज सभेचं आयोजन केलं आहे.
6/7

कोकणात नारायण राणे आणि आ भास्कर जाधव यांचा वाद शिगेला पोहचला आहे.त्यातच माजी खासदार निलेश राणे यांची गुहागर येथे सभा होणार आहे.
7/7

त्यापूर्वीच आमदार भास्कर जाधव धमकीचे फोन आणि मेसेज आल्याने त्यांच्या कार्यालय बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी पोलिस अलर्ट मोडवर आहे.
Published at : 16 Feb 2024 06:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























