एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2022 : चिपळूणमध्ये 'बाबा मला मारु नका' या संकल्पनेवर आधारित सामाजिक संदेश; जिवंत देखाव्यातून जनजागृती
Ganesh Chaturthi 2022 : चिपळूणमधील महर्षी आण्णासाहेब कर्वे मित्र मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवात 'बाबा मला मारु नका' या जिवंत देखाव्यातून अनोख्या पद्दहतीने जनजागृती केली आहे.
Ganesh Chaturthi 2022
1/10

महाराष्ट्रापासून देशभरात सध्या गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातोय.
2/10

या निमित्ताने घरोघरी तसेच सार्वजनिक गणपती मंडळात देखाव्या बरोबरच सामाजिक संदेशही देण्यात येतोय.
3/10

चिपळूणमधील महर्षी आण्णासाहेब कर्वे मित्र मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवात असाच एक सामाजिक संदेश देणारा अनोखा देखावा सादर केला आहे.
4/10

'बाबा मला मारु नका' या संकल्पनेवर आधारित जिवंत देखाव्यातून अनोख्या पद्धतीने जनजागृती या मंडळाने केली आहे.
5/10

या देखाव्यातून अनोख्या पद्धतीने जनजागृती करत ज्वलंत विषयावर सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा हा देखावा आहे.
6/10

वंशाला दिवा पाहिजे म्हणून अनेकांना मुलगा व्हावा अशी अपेक्षा असते.
7/10

त्यासाठी देवधर्म, नवस, प्रसंगी अघोरी कृती देखील केली जाते.एवढेच नाही तर स्त्रीभुषण हत्याही केली जाते.
8/10

या जिवंत देखाव्याच्या माध्यमातून हा ज्वलंत सामाजिक प्रश्न या देखाव्याने प्रकाशझोतात आणला आहे.
9/10

हा देखावा पाहण्यासाठी चिपळूणकरांकडून उत्तम प्रतिसादही मिळत आहे.
10/10

महर्षी आण्णासाहेब कर्वे मित्रमंडळाकडून गणेशोत्सवात गेली 42 वर्ष पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विविध विषयांवर देखावे सादर केले जातात.
Published at : 07 Sep 2022 06:44 PM (IST)
आणखी पाहा























