एक्स्प्लोर
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवरायांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा! हजारो शिवभक्तांची उपस्थितीत रायगड दुमदुमला
Raigad Shivrajyabhishek Din : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यभिषेक सोहळ्याला तिथीनुसार आज 350 वर्ष पूर्ण झाली आहेत.
Shivrajyabhishek Din | Raigad News
1/14

यंदा किल्ले रायगडवर (Raigad Fort) शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतोय.
2/14

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकाळी नऊ वाजेच्या सुमाराला किल्ले रायगडावर दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला.
3/14

किल्ल्यावर शाही शोभायात्रा काढण्यात आली. किल्ले रायगडावर तत्कालीन राजदरबार उभारण्यात आला आहे, तसेच शिवभक्तांची उत्तम सोयही करण्यात आली आहे.
4/14

सकाळी 7 वाजता ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक राजकीय नेते आज रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित आहेत.
5/14

नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकाळी 9 वाजता मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर श्री शिवसन्मान सोहळा संपन्न झाला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास शिवपालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
6/14

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे.
7/14

राज्यभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. या कार्यक्रमासाठी रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे.
8/14

रायगडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करून ठेवता येणार आहे.
9/14

उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर 10 हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी 40 हजार लीटर पाणीसाठा करण्यात आला आहे.
10/14

शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 वैद्यकीय केंद्र तयार करण्यात आली आहेत..
11/14

गडाच्या पायथ्याशी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात 3 हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.
12/14

गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. रोप-वे मार्ग हा निमंत्रितांसाठी मर्यादित राहणार आहे.
13/14

रायगड किल्ले परिसरात जवळपास 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
14/14

याशिवाय पायरी मार्गाने रात्री गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पायरीमार्गावर पुरेसे पथदिवे लावण्यात आले आहेत.
Published at : 02 Jun 2023 12:08 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















