एक्स्प्लोर
काळ आला होता पण वेळ नव्हती; हैदराबादच्या पर्यटकांची कार माथेरानमध्ये पलटी, 5 जखमी
सध्या पावसाळा असल्याने निसर्ग सौंदर्याचा आणि पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कर्जत डोंगराजवळील माथेरान येथे देशभरातून पर्यटक येतात.
Matheran tourist car accident
1/7

सध्या पावसाळा असल्याने निसर्ग सौंदर्याचा आणि पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कर्जत डोंगराजवळील माथेरान येथे देशभरातून पर्यटक येतात.
2/7

माथेरान असो किंवा कुठलंही पर्यटनस्थळ असो अनेकदा रॅश ड्रायव्हिंग किंवा स्टट हे पर्यटकांच्या अपघाताला कारणीभूत ठरतात, काहीवेळ त्यात जीवही गमवावा लागतो.
3/7

परंतु, सुदैवाने काळ आला होता वेळ आली नव्हती, असेच काहीसे माथेरान येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या बाबतीत घडलं आहे. सुदैवाने या अपघातानंतर कारमधील पाचही प्रवासी जीवित असून किरकोळ जखमी झाले आहेत
4/7

थंड हवेचे ठिकाण असलेल्या रायगडच्या माथेरानमध्ये हैदराबादवरुन माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एर्टिगा कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
5/7

पर्यटकांच्या वाहनाचा अचानक ब्रेक फेल झाला आणि हे वाहन चक्क माथेरान घाटातच पलटी झालं, सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवतहानी झाली नसून वाहनातील सहापैकी 5 प्रवासी गंभीर जखमी आहेत.
6/7

एर्टींगा कारमधून 6 प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी 5 जणांना अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना नेरळमधील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
7/7

दरम्यान, भंडाऱ्यात पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकनं समोर जाणाऱ्या ट्रकला भीषण धडक दिल्याने अपघाताची घटना घडली असून या अपघातात ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला आणि त्यात अडकून ट्रकचा चालकाला मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Published at : 08 Jul 2025 07:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























