एक्स्प्लोर
Raigad heavy rain updates: रायगडमध्ये तुफान पाऊस, खेडमध्ये धोक्याचा सायरन वाजला, नागोठण्यात रस्त्यावर बोटी उतरवल्या
Raigad heavy rain news: रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरुन वाहत असून पाऊस सुरु राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mumbai Crime Sathaye college
1/15

रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
2/15

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यासह खोपोली परिसरात देखील पावसाचा जोर कायम असून पाताळगंगा नदी आता दुथडी भरून वाहू लागली आहे.
3/15

सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीवरील पुलाला पाणी लागल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
4/15

खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे.
5/15

कोकणातील रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खेड आणि नागोठणे या शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
6/15

खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून आता नदीचे पाणी मार्केट परिसरात शिरले आहे. अशातच संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे.
7/15

खेडमध्ये जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केटमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुख्य मार्केटमध्येही पावसाचे पाणी शिरु शकते. या परिस्थितीवर स्थानिक प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे.
8/15

खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी मटन मार्केट परिसरात शिरले आहे. त्यामुळे नगरपरिषदेने सायरन देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
9/15

रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, नागोठणे येथील अंबा नदीने इशारा पातळीच्या वर वाहत आहे.
10/15

नागोठणे शहरात रस्त्यावर नदीचे पाणी आले आहे.त्यामुळे प्रशासनाने याठिकाणी बोटी उतरवल्या आहेत.
11/15

जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज ठेवले आहे.
12/15

नागोठणे शहर जलमय झाले असून घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.
13/15

नागोठणे परिसरात आणखी काही तास पाऊस सुरु राहिल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
14/15

नागोठणे शहरातील बाजारपेठेच्या परिसरात पाणी साचले आहे.
15/15

नागोठणे परिसरात नागरिकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
Published at : 19 Jun 2025 02:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
व्यापार-उद्योग
बीड
























