एक्स्प्लोर

गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या फोननंतर पोलीस उपायुक्तांनी सांगितलं कारण

Gautami Patil: गौतमी पाटील हिच्या गाडीने झालेल्या अपघात प्रकरणात रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप पुणे पोलिसांनी फेटाळले आहेत. अपघातावेळी गौतमी पाटील या गाडीत होती की नाही याचा तपास सुरू आहे.

पुणे : शहरातील वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला कारने धडकेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याने त्यांनी थेट कोथरुडचे (Pune) आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. विशेष म्हणजे ज्या कारने रिक्षाला धडक दिली ती कार नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी गौतमी पाटीला या अपघातप्रकरणी नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी असून सामाजी विठ्ठल मरगळे असे त्याचे नाव आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावर कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Call to DCP) यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोषींवर कडक कारवाई करण्याची निर्देश दिले आहेत. आता, पोलीस उपायुक्त संभाजी कदम (Police) यांनी गौतमी पाटीलवर कुठलाही कारवाई करता येणार नसल्याचे म्हटले. त्यासाठी, त्यांनी कायदेशीर बाजूही सांगितली.

गौतमी पाटील हिच्या गाडीने झालेल्या अपघात प्रकरणात रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप पुणे पोलिसांनी फेटाळले आहेत. अपघातावेळी गौतमी पाटील या गाडीत होती की नाही याचा तपास सुरू आहे, पण चालकावर कारवाई केली आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. कायद्यानुसार अपघातात को-पॅसेंजरवर कारवाई केली जात नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे, गौतमी पाटीलवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. गौतमी पाटील हिने गाडीचे संपूर्ण कागदपत्रं पोलिसांकडे सादर केले आहेत. तसेच, गरज भासल्यास गौतमी पाटीलला चौकशीसाठी बोलवलं जाईल. मात्र, गौतमीला सध्या तरी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं नाही. गौतमी पाटील गाडीत होती की नाही याबाबतचं कोणतंही स्पष्टीकरण अजून समोर आलेले नाही. संपूर्ण प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे सुरू असल्याचे पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

नेमकं अपघात प्रकरण काय? (Gautami patil car accident)

पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबर रोजी एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या भरधाव कारनं उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे.

गौतमी पाटीलवर अपघातग्रस्तांचा आरोप (Gautami patil)

गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीमकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही, पोलीस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी केलाय.

हेही वाचा

अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget