एक्स्प्लोर
रायगडमधील एक गाव-एक दहीहंडी, चक्क विहिरीवर बांधली जाते हंडी, अख्खा गाव जमतो; पाहा फोटो
रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामध्ये कुर्डूस गाव आहे, या गावांमध्ये एक गाव एक दहीहंडी असा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.
Raigad dahihandi well
1/10

रायगड जिल्ह्यातील एक गाव एक दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेली अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावामध्ये 33 वर्षाची परंपरा असलेल्या या गावात विहिरीवर 25 फूट उंचीवर दहीहंडी फोडण्याची वेगळीच प्रथा आहे.
2/10

रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामध्ये कुर्डूस गाव आहे, या गावांमध्ये एक गाव एक दहीहंडी असा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.
3/10

दहीहंडी पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने गोविंदा दाखल होतात. यंदा देखील ही दहीहंडी पाण्यासाठी हजारोंच्या संख्येने येथील दहीहंडी उत्सवात गर्दी उसळली आहे.
4/10

गावच्या मध्यावर असलेली ही विहीर 40 फूट खोल आहे, मात्र या विहिरीच्या उंचीवर 25 फुटावर बांधण्यात आलेल्या दहीहंडीला फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथक अपयशी ठरतात.
5/10

गावच्या मध्यावर असलेली ही विहीर 40 फूट खोल आहे, मात्र या विहिरीच्या उंचीवर 25 फुटावर बांधण्यात आलेल्या दहीहंडीला फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथक अपयशी ठरतात.
6/10

येथील दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला असून विहिरीवर लटकवलेली हंडी फोडण्यासाठी गोविंदा काही थर बसवून उंच उंडी मारतात. त्यानंतर, ते थेट विहिरीत पडतात.
7/10

दहीहंडी फोडण्यासह पाण्यात पोहण्याचा आनंद देखील कुर्डूस गावातील गोविंदांना मिळतो. त्यामुळे, या दहीहंडीचा जिल्हाभर चर्चा असते, दूरच्या गावातून हा दहीहंडी उत्सव पाहायला लोक येतात.
8/10

विहिरीच्या आजूबाजूने पाहण्यासाठी लोकांनी रिंगण केल्याचं दिसून येतं, त्यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग असतो, विहिरीशेजारी ही दहीहंडी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते
9/10

दरम्यान, रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यामधील जांबुलपाडा गावात अनोखी दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. अंगावर आसुडाचे फटके मारत ही दहीहंडी फोडली जाते.
10/10

गोविंद पथक नाचत-खेळत या दहीहंडी जवळ येतात आणि आपल्या अंगावर आसूडाचे फटके मारत हा गोपाळकाळा साजरा करतात. त्यामुळे हा अनोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण दहीहंडी फोडण्याचा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी होते.
Published at : 16 Aug 2025 05:13 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























