Thane News Eknath Shinde: ठाण्याच्या डीपीडीसी बैठकीत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, संकेत घरत यांची स्टेमच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन उचलबांगडी
Thane News Eknath Shinde : ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Thane News Eknath Shinde: ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेत STEM (ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या सरकारी संस्थेच्या) व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत (Sanket Gharat) यांची तात्काळ उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी नव्या आणि पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
ही बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, संजय केळकर, राजेश मोरे, सुरेश (बाळा मामा) म्हात्रे, किसन कथोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाल, जि.प. CEO रोहन घुगे, ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचीही उपस्थिती होती. तथापि, या महत्त्वपूर्ण बैठकीस मंत्री गणेश नाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड अनुपस्थित होते.
संकेत घरत यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह (Sanket Gharat Appointment)
बैठकीदरम्यान STEM या पाणीपुरवठा करणाऱ्या सरकारी संस्थेतील संकेत घरत यांची नियुक्ती ही अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा गंभीर आरोप काही लोकप्रतिनिधींनी केला. आमदार संजय केळकर यांनी अधिकृत आणि अनधिकृत इमारतींबाबत प्रश्न उपस्थित करत, STEM मध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे चर्चेस आणले. रईस शेख यांनीही भिवंडी महानगरपालिकेला STEM कडून पाणी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, यामागे भ्रष्ट कारभार असल्याचा आरोप केला.
एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय (Eknath Shinde Big Decision)
या आरोपांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेत घरत यांची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच "संकेत घरत यांचा तात्काळ चार्ज काढून टाका" असे स्पष्ट आदेश देत, योग्य अधिकाऱ्याची निवड का झाली नाही, याचाही तपास करण्याचे निर्देश दिले.
BEST च्या महाव्यवस्थापकपदी सुभाष उमराणीकर यांची नियुक्ती (Subhash Umranikar appointed as General Manager of BEST)
या घडामोडींसोबतच, BEST (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय & ट्रान्सपोर्ट) च्या महाव्यवस्थापकपदी सह सचिव सुभाष उमराणीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी तात्पुरता पदभार सनदी अधिकारी अशिषकुमार शर्मा यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची GM पदासाठी नियुक्ती निघाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सुभाष उमराणीकर यांची BEST च्या महाव्यवस्थापकपदी निश्चित करण्यात आली.
आणखी वाचा
























