एक्स्प्लोर

Sonam Wangchuk: पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच सोनम वांगचूक यांना अटक; विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत लडाखला भाजप कार्यालय पेटवलं, इंटरनेट बंद, सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू, शाळा आणि महाविद्यालये देखील बंद

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अटक करण्यात आली आहे. केंद्राने वांगचुक यांच्या SECMOL संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द केला असून CBI तपास सुरू आहे.

Sonam Wangchuk: लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना (Sonam Wangchuk arrest Ladakh) अटक करण्यात आली. लेहमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारासाठी सरकारने वांगचुक यांना जबाबदार धरलं आहे. तथापि, त्यांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वांगचुक यांच्या अटकेनंतर लेहमध्ये इंटरनेट बंद (Ladakh violence internet shutdown) करण्यात आले आहे. 24 सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू लागू आहे. शाळा आणि महाविद्यालये शनिवारपर्यंत बंद आहेत. पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी (Leh curfew statehood demand) लेहमध्ये झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला. चार तरुणांचा मृत्यू झाला आणि 40 पोलिसांसह 80 जण जखमी झाले. आतापर्यंत 60 जणांना अटक करण्यात आली आहे. 

वांगचूक यांच्या संस्थेचा परकीय निधी परवाना रद्द (SECMOL FCRA cancelled)

गृह मंत्रालयाने वांगचुक यांच्या मालकीच्या संस्थेच्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) चा परकीय निधी परवाना रद्द केला आहे. परदेशी अनुदान किंवा देणग्या मिळवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना परकीय योगदान (नियमन) कायद्याअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. सीबीआयने वांगचुक यांच्या मालकीच्या आणखी एका एनजीओ, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज लडाख (एचआयएएल) ची परदेशी निधी (एफसीआरए) प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. एचआयएएलवरही एफसीआरएचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. सीबीआय टीम एनजीओचे खाते आणि रेकॉर्ड तपासत आहे.

सोनम वांगचुक काय म्हणाले? (CBI probe Wangchuk NGO)

सीबीआयला फक्त 2022 ते 2024 पर्यंतच्या खात्यांची तपासणी करायची होती, परंतु आता ते 2020 आणि 2021 मधील रेकॉर्ड देखील तपासत आहेत. ते तक्रारीच्या व्याप्तीबाहेरील शाळांकडून कागदपत्रे देखील मागत आहेत. स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल केला. कामगारांना वेतन न दिल्याचा आरोप करणारी चार वर्षांपूर्वीची जुनी तक्रार देखील पुन्हा उघडण्यात आली आहे. सरकारने कोणतेही शुल्क आकारले नसल्याचे सिद्ध करूनही भाडेपट्टा रक्कम दिली गेली नसल्याचा दावा करून सरकारने एचआयएएलला दिलेला जमीन भाडेपट्टा रद्द केला. आयकर विभागाकडून नोटीस देखील मिळाली आहे आणि आता सीबीआय चौकशी सुरू आहे. लडाखमध्ये कोणताही कर नाही, तरीही मी स्वेच्छेने कर भरतो. असे असूनही, नोटीसा पाठवल्या जात आहेत.

हिंसाचार कसा झाला? (Ladakh violence) 

23 सप्टेंबरच्या रात्री निदर्शकांनी लडाख बंदची हाक दिली. लेह हिल कौन्सिलमध्ये पोहोचण्यासाठी लोकांना आवाहन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. याचा परिणाम झाला आणि मोठ्या संख्येने लोक आले निदर्शकांना रोखण्यासाठी लेह हिल कौन्सिलसमोर बॅरिकेड्स उभारण्यात आले. निदर्शक पुढे सरकताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, परंतु जमावाने पोलिसांचे वाहन जाळले आणि तोडफोड केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget