एक्स्प्लोर

BLOG: नवरात्री विशेष | भाग 4 : सिंधुताई सपकाळ – संकटांना हरवून मातृत्वाची मूर्ती

ब्लॉग: नवरात्र म्हणजे नऊ स्त्री शक्तींचं प्रतीक. आणि या नऊ दिवसांत आपण अशाच नऊ प्रेरणादायी स्त्रियांना उजाळा देतो आहोत. आजचा दिवस आपण अर्पण करतो त्या आईला, जिने हजारो अनाथ जीवांना फक्त छतच नाही दिलं, तर त्यांना माणूस म्हणून उभं केलं – आणि हे करताना, स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचून टाकलं... आई असणं हे नुसतंच जन्म देणं नसतं, तर आयुष्य देण्याची कला असते. अशीच एक विलक्षण स्त्री म्हणजे सिंधुताई सकपाळ. जी स्वतःच्या आयुष्यातल्या दुःखांना विसरून, इतरांच्या आयुष्यात आनंद पेरत गेली. कुणी तिला 'माई' म्हटलं, कुणी 'देवता', पण तिचं खऱ्या अर्थाने नाव पडलं – मातृत्वाची मूर्ती.

संघर्षमय आयुष्याची सुरुवात

बालपण गरिबीत गेलं. शिक्षणाची आवड असूनही परिस्थितीमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही. लहान वयातच लग्न झालं आणि त्यानंतर आयुष्याने त्यांना कठोर परीक्षा दिली. अन्याय, उपेक्षा, घरातून हाकलणं अशा प्रसंगांतही त्यांनी हार मानली नाही.

धैर्याचं उदाहरण

सिंधुताई गर्भवती असताना त्यांना घराबाहेर काढण्यात आलं. त्यावेळी आधारासाठी कोणी नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांनी गायीच्या गोठ्यात आपल्या मुलीला जन्म दिला. हा प्रसंग त्यांच्या आयुष्याचा वळणबिंदू ठरला. कारण त्या क्षणापासून त्यांनी स्वतःपुरतं जगणं सोडलं आणि इतर गरजूंच्या दुःखात सहभागी होण्याचा संकल्प केला.

'माई' बनण्याचा प्रवास

भटकंती करून, भिक्षा मागून, गायन करून त्यांनी जगणं सुरू ठेवलं. पण लवकरच त्यांच्या आयुष्याचं ध्येय वेगळं ठरलं ते म्हणजे अनाथ मुलांचं संगोपन. रस्त्यावर, स्टेशनवर, समाजाच्या कडेला फेकलेली लेकरं त्यांनी उचलली आणि आपल्या लेकरांसारखा त्यांनी सांभाळ केला. यामुळे त्यांना सर्वजण "माई" म्हणून ओळखू लागले.

मातृत्वाची मूर्ती

सिंधुताईंच्या आश्रमातून आज हजारो मुलं समाजात सक्षम आणि स्वावलंबी झाली. या मुलांनी आता समाजात आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  त्यांनी केवळ आधार दिला नाही, तर त्यांना शिक्षण, संस्कार आणि उभं राहण्याची हिंमत दिली.  त्याग, मातृत्व आणि धैर्याचं असं अद्भुत मिश्रण क्वचितच दिसतं.

प्रेरणा आजच्या पिढीसाठी

सिंधूताईंची अर्थात माईंची कथा शिकवते की संकट कितीही असली तरी जिद्द आणि धैर्य असेल तर आपण स्वतःसह इतरांचं आयुष्य बदलू शकतो. सिंधुताईंच्या जीवनातली खरी देवी मूर्ती म्हणजे मानवतेचं मातृत्व. नवरात्रीत आपण ज्या देवीच्या विविध रूपांची पूजा करतो, त्याचं जिवंत रूप आपल्या काळात दिसलं ते सिंधुताई सकपाळ यांच्या रूपानं. त्यांचं आयुष्य म्हणजे चिकाटी, धैर्य आणि ममता यांचं दैवी मिश्रण आहे.

हेही वाचा

BLOG : नवरात्री विशेष | भाग 3 : सरला शर्मा – आकाश जिंकणारी पहिली भारतीय महिला

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shiv Sena VS BJP : राजकीय रामलीला, सेना - भाजपचा कल्ला! राज्याच्या सत्तेत दोस्ती, पालघरच्या आखाड्यात कुस्ती Special Report
Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget