एक्स्प्लोर
91 स्वराज्यरथांसह पुण्यात अवतरली शिवशाही; पाहा साहसी खेळाचे खास फोटो...
शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून शिवजयंती निमित्त शिवरायांना भव्यदिव्य मानवंदना दिली.

shiv jayanti
1/8

शिवजयंती निमित्त शिवरायांना भव्यदिव्य मानवंदना दिली.
2/8

तब्बल 91 स्वराज्यरथांसह पुण्यात शिवशाही पुण्याच्या रस्त्यावर अवतरली होती.
3/8

फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊशहाजी शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे 91 स्वराज्यरथ, महाराणी ताराराणी शौर्य पथकातील 51 रणरागिणींच्या मर्दानी खेळाद्वारे चित्तथरारक मानवंदना देण्यात आली.
4/8

51 रणशिंगांची ललकारी, नादब्रह्म ढोलताशा पथकाचा रणगजर, सनई-चौघडयांचे मंगलमय सूर हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.
5/8

शिवजयंती महोत्सव समिती तर्फे लालमहाल पासून आयोजित 'शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा' या भव्यदिव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
6/8

मिरवणुकीचे उद्घाटन शिवरायांचे वंशज आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते झालं.
7/8

मिरवणुकीचे यंदा 11 वं वर्ष आहे.
8/8

शिवजयंती महोत्सव समिती तर्फे लालमहाल येथून स्वराज्यरथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत ९१ स्वराज्यरथांनी सहभाग घेतला. यावेळी शिवकालीन मर्दानी खेळ सादर झाले.
Published at : 19 Feb 2023 07:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
