एक्स्प्लोर
Bhushi Dam : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले, पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले, पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना
Bhushi Dam : पुण्यातील भुशी डॅममध्ये बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांनी काळजी घेणं आवश्यक आहे.
भुशी डॅममध्ये दोघे बुडाले
1/5

लोणावळ्याच्या भुशी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात धरणाच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
2/5

साहिल शेख आणि मोहम्मद जमाल अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती आहे.
3/5

वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी हे तरुण या ठिकाणी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतोय.
4/5

लोणावळ्याच्या शिवदुर्ग रेस्कयू टीम ने या दोघांचे ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. यावेळी पोलीस देखील उपस्थित होते.
5/5

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडून झाल्यानं आगामी काळात पर्यटकांनी काळजी घेणं आवश्यक आहे.
Published at : 08 Jun 2025 06:06 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक


















