एक्स्प्लोर

Tiger 2025 Japani Movie Review: टायगर : भारतीय दिग्दर्शकाची जापनिज गे कथा

Tiger 2025 Japani Movie Review: "मी पहिल्यांदा एका 'गे' व्यक्तीला इतक्या जवळून पाहतोय..." टायगोच्या बहिणीचा नवरा त्याला सांगतो. त्यावर टायगो म्हणतो, "आम्ही ही माणसं आहोत. माणसांसारखेच दिसतो..." इथून खरा संघर्ष सुरू होतो. टायगोनं वयाची तिशी ओलांडली आहे. तो गे आहे. घरात सध्या फक्त डॉक्टर बहिणीला माहितेय. वडिलांपासून त्यानं हे लपवलंय. आई जिवंत असताना तिला याची कल्पना होती. पण आईचं प्रेम हे कुठल्याही अटीशर्ती पलिकडचं असतं. म्हणूनच आईच्या मृत्यूनंतर आपण काय आहोत, कोण आहोत हे घरच्यांना, आजूबाजूवाल्यांना सांगण्यापेक्षा टायगोनं टोकयो शहर गाठलंय. तिथं तो गे मसाज सेंटरमध्ये काम करतोय. त्याला गे पॉर्न स्टार व्हायचंय. त्यासाठी त्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व परिस्थितीत त्याला समजून घेईल, अशी एकच व्यक्ती आहे. ती म्हणजे, त्याची दोन अडीच वर्षांची भाची. तो कोण आहे, त्याची लैंगिकता काय? ती चांगली की, वाईट याची तिला कल्पना नाही. तो तिच्यावर आणि ती त्याच्यावर प्रेम करते, हेच त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणूनच तिचं त्याचं विश्व आहे. तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे. 

दिग्दर्शक अंशुल चौहानच्या या टायगर (2025) सिनेमाला दक्षिण कोरियातल्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हाय-लाईफ पुरस्कार मिळाला. जगभरात एलजीबीटीक्यु (LGBTQ) समुदायाची आपल्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. समान हक्कासाठी ते रस्त्यावर उतरलेत. जपानही त्याला अपवाद नाही. समलैंगिक संबंधांकडे आजही कलुषित नजरेतून पाहिलं जातं. म्हणून मग हे लोक आपली ओळख, आपली लैंगिकता लपवतात. इथून समस्यांना सुरुवात होते. लग्न करण्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक दबाव येतो. अनेकजण लग्न करतातही पण मग पुढचा प्रवास खुपच किचकट आणि कटकटीचा असतो. समलैंगिक संबंध ठेवणारे बहुतांश वेळा लग्न टाळण्याचा प्रयत्न करतात. यातून वेगळीच समस्या उदभवते. वय वाढतं तसं आपली ओळख आपली लैगिंकता याबाबतचा दबाव वाढत जातो. या समाजात आपण मिसफिट आहोत, अशी भावना वाढीला लागते. यातून आत्महत्यांसारखं प्रमाण वाढतंय. अंशुलच्या या सिनेमात हे सर्व काही आलेलं आहे. 

Tiger 2025 Japani Movie Review: टायगर : भारतीय दिग्दर्शकाची जापनिज गे कथा

समाज मान्यता नसल्याने हे सर्व छुपके-छुपके सुरू असतं. टायगो ही अशाच एका छोट्या शहरात वाढलेला आहे. जिथं त्याचा एक समलैंगिक पार्टनर आहे. त्या दोघांनी आपली लैंगिक ओळख लपवलेली आहे. मित्रानं लग्न केलंय तर टायगो या सर्वांपासून लांब टोकयो महानगरात निघून आलाय. तिथल्या गर्दीत आपली ओळख छुपी राहिल आणि समलैंगिक समुदायाशी जोडता येईल अशी त्याची धारणा असते. घडतं ही तसंच. पण कौटुंबिक जबाबदाऱ्या कुणालाच चुकलेल्या नाहीत. घरचा कर्ता मुलगा असल्यानं त्याच्यावर थोड्या प्रमाणात का असेना पण त्या येतात आणि मग त्याची घालमेल सुरू होते. 

जपानसारख्या प्रगत देशात आणि टोकयोसारख्या शहरात अजूनही गे मसाज पार्लर हे छुप्या पद्धतीनं सुरू आहेत. त्याची अशी एक अर्थव्यवस्था तयार झालीय. यातूनच गे पॉर्न हा प्रकार वाढलाय. टायगोला आपल्या गे सेक्स कौशल्याची कल्पना आहे. म्हणूनच त्याला पॉर्न स्टार व्हायचंय. आपली ओळख, आपली आयडेंटीटी जगासमोर आणण्याची त्याची ही स्वतानं तयार केलेली पद्धत आहे. नेमकं हे वेळेआधी घरी समजतं आणि जे काही घडतं यावर अंशुलचा टायगर सिनेमा बेतलेला आहे. 

Tiger 2025 Japani Movie Review: टायगर : भारतीय दिग्दर्शकाची जापनिज गे कथा

जपानमध्ये गे संबंधांना अजूनही मान्यता नाही.  अशावेळी अनेक सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. त्यातून भिन्नलिंगी समलैंगिक लोकांना एकत्र आणून त्यांचं लग्न लावून द्यायचं आणि त्यांनी आपआपल्या लैंगिक प्राधान्यानुसार, पुढचं आयुष्य जगायचं यासाठी अनेक एलजीबीटीक्यु संघटना काम करतायत. ही कम्युनिटी फिलींग वाढतेय. समाजातून हेळसांड होत असताना, समाज आपली लैंगिकता नाकारत असताना या एलजीबीटीक्यु कम्युनिटीनं काढलेला हा मध्यम मार्ग आहे. तो काही प्रमाणात यशस्वी झाल्याचंही दिसतंय. 

अंशुलच्या टायगर सिनेमाचा 70 टक्क्यांहून अधिक क्रू हा एलजीबीटीक्यु कम्युनिटीमधला होता. आपली गोष्ट सिनेमाच्या माध्यमातून आणण्यासाठी यातल्या प्रत्येकानं कसोशीनं प्रयत्न केला आहेत. टायगर हा कलेक्टिव्ह एलजीबीटीक्यु सिनेमा आहे, असं म्हणायला हरकत नाही. एका समुदायानं, आपल्या समुदायासाठी बनवलेला सिनेमा. बुसाननंतर आता जगभरातून टायगर सिनेमाला मागणी वाढली आहे. सिनेमा भव्यदिव्य अजिबात नाही. त्याची गोष्ट समान रेषेतली आहे. पण त्या गोष्टीवरची अंशुलची पकड भक्कम आहे. तो गोष्टीबाहेर जात नाही. म्हणूनच हा सिनेमा म्हणून तो भारी ठरतो.  

Tiger 2025 Japani Movie Review: टायगर : भारतीय दिग्दर्शकाची जापनिज गे कथा

टायगर सिनेमात एलजीबीटीक्यु समुदायाशी संबंधित सर्वच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मग कुटुंब व्यवस्थेत या समुदायाचं अस्तित्व मान्य करणं, त्यांना प्रॉपर्टीचे अधिकार मिळणं, समुदाय म्हणून ओळख आणि अखेर माणूस म्हणून स्विकारा अशी आर्त हाक, असुरक्षित आणि छुप्यापध्दतीनं केलेल्या शारिरीक संबंधातून होणारे एड्स आणि सिफलिस साऱखे आजार, हे या सिनेमाची खासियत आहे. नुकताच मराठींच साबर बोडं (2024) हा सिनेमा येऊन गेला. त्याचतली गे समुदायाची स्थिती आणि टायगरमधली स्थिती समान आहे.  

दिग्दर्शक अंशुल चौहान हा मुळचा एनिमेटर, पक्का भारतीय. तो जपानमध्ये गेला आणि तिथंच स्थायिक झाला. त्याच्या नावावर आता चार सिनेमे आहेत. टायगरनं त्याला चांगली प्रसिध्दी दिलेय. फेस्टिव्हल सर्किटमध्ये टायगरला मागणी आहेच. शिवाय लवकरच तो दक्षिण कोरियात रिलीजही होतोय. भारतातल्या गोवा इथं होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आफ इंडिया (2025) अर्थात इफ्फीमध्ये ही टायगर असेल. भारतीय दिग्दर्शकानं जपानी भाषेत बनवलेल्या या सिनेमाला भारतीय प्रेक्षक कशी साथ देतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
Latur Crime: लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
CM Yogi Meets PM Modi: सीएम योगींची थेट दिल्लीत धडक अन् पीएम मोदींची सुद्धा घेतली भेट; नेमकं काय घडतंय?
सीएम योगींची थेट दिल्लीत धडक अन् पीएम मोदींची सुद्धा घेतली भेट; नेमकं काय घडतंय?
Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
Embed widget