एक्स्प्लोर
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटात सापडली, पुण्यातील नवले पुलाजवळ काय घडलं?
पुणे: नवले पूलावर गौतमी पाटीलच्या गाडीने रिक्षाला धडक दिली; रिक्षाचालक जखमी. पोलिसांनी नोटीस दिली, तपास सुरू; नातेवाईकांनी अटक मागणी केली.
Gautami Patil
1/9

30 सप्टेंबरच्या पहाटे पुण्यातील नवले पूलावर नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीने रिक्षाला धडक दिली, ज्यात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला. अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती.
2/9

रिक्षाचालकांच्या नातेवाईकांनी तिला अटक करून कारवाई करण्याची मागणी केली. सिंहगड पोलिस ठाण्याबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन केले आणि सांगितले की, भाऊ पहाटे पाच वाजता पॅसेंजरची वाट पाहत होता.
3/9

त्याची रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती. मागून आलेल्या कारने रिक्षाला ठोकून तीनवेळा पलटी घालवल्या, ज्यामुळे रिक्षाचालक जखमी झाला. धडक दिल्यानंतर कारचे लोक निघून गेले; अर्धा तासानंतर टोईंग व्हॅन आणून गौतमी पाटीलची कार घटनास्थळावरून नेण्यात आली.
4/9

जखमी रिक्षाचालक रस्त्यावर पडून होता; रिक्षावाल्यांनी मदत केली, ज्यामुळे त्याचा जीव वाचला, असा आरोप नातेवाईकांनी केला.
5/9

अपघातानंतर पोलिसांनी कार चालकाला अटक केली, परंतु अपघाताच्या वेळी तो तिथे नव्हता; वैद्यकीय तपासणीसाठी दुसरा ड्रायव्हर सादर केला गेला. हायवेवरील कॅमेरे बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
6/9

आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने कारवाईची सूचना दिल्यानंतर पुणे पोलिसांची कारवाई सुरु झाली. पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला शुक्रवारी नोटीस धाडली आणि चौकशीसाठी विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
7/9

परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहेत. रिक्षाचालकांच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील सेलिब्रिटी असल्यामुळे कारवाई मंद असल्याचा आरोप केला; तपासाची माहिती आता त्यांच्या मुलीला दिली जाईल.
8/9

रिक्षाचालकांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पुण्यासारख्या शहरात असे कसे होऊ शकते? अपघाताची कार गौतमी पाटीलची असल्यामुळे तिला शिक्षा होणे आवश्यक आहे.
9/9

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 04 Oct 2025 01:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























