Mahima Chaudhary Sanjay Mishra Viral Video: 52 वर्षांच्या महिमा चौधरीनं, 62 वर्षांच्या संजय मिश्रांसोबत बांधली लग्नगाठ? पॅपाराझींसमोर नवविवाहित जोडप्याप्रमाणे दिल्या पोज
Mahima Chaudhary Sanjay Mishra Viral Video: अभिनेत्री महिमा चौधरी ब्रायडल लूकमध्ये अभिनेता संयज मिश्रांसोबत पोज देतेय, तसेच, पॅपाराझींना मिठाई खाऊन जा, असंही सांगतेय.

Mahima Chaudhary Sanjay Mishra Viral Video: बॉलिवूडची (Bollywood News) स्टार अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary) सध्या गूगलवर ट्रेंड करतेय. अचानक महिमा चौधरी ट्रेंडमध्ये का आलीय? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. पण, तिचं ट्रेंडमध्ये येण्याचं कारण ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओमध्ये 52 वर्षांच्या महिमा चौधरीनं दुसरं लग्न केलंय. कारण ती ब्रायडल लूकमध्ये अभिनेता संयज मिश्रांसोबत (Sanjay Mishra) पोज देत असल्याचं पाहायला मिळतंय. सर्व पॅपाराझी त्या दोघांना शुभेच्छा देतायत आणि त्यानंतर महिमा चौधरी पॅपाराझींना मिठाई खाऊन जा, असंही सांगतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून चाहते पुरते चक्रावून गेले आहेत.
View this post on Instagram
थांबा... गोंधळून जाऊ नका... कारण महिमा चौधरी, संजय मिश्रा यांनी दुसरं लग्न केलेलं नाही. तर, दोघेही आगामी सिनेमा 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी'चं प्रमोशन करत आहेत. त्यासाठी महिमा चौधरी नववधूच्या रुपात आलेली. तर, संजय मिश्रा वराच्या रुपात दिसले. या फिल्मच्या प्रमोशनचं फोटोशूट सुरू होतो. तेव्हाच पॅपाराझींसमोर संजय मिश्रा आणि महिमा चौधरी एकत्र पोझ देताना दिसले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, अभिनेत्री महिमा चौधरीनं गेल्या काही दिवसांत आपला आगामी सिनेमा दुर्लभ प्रसादचं दुसरं लग्नचं मोशन पोस्टर शेअर केलेलं. ज्यामध्ये संजय मिश्रा, महिमा चौधरी सिनेमातल्या लूकमध्ये दिसून आले. पोस्टरमध्ये एका पन्नास वर्षांच्या व्यक्तीच्या दुसऱ्या लग्नाचं पॅम्प्लेट छापलेलं दिसतंय. यासोबतच अभिनेत्रीनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'नवरी मिळालीय, आता तयार व्हा... कारण लवकरच वरात निघणार आहे...' या फिल्ममध्ये संजय मिश्रा, महिमा चौधरीसोबतच व्योम आणि पलक ललवानी दिसत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























