एक्स्प्लोर
Bogus Voters: 'निवडणूक आयोगाचे अधिकारी डोक्यावर पडलेत का?'; MNS नेते Gajanan Kale यांचा संतप्त सवाल
नवी मुंबईतील (Navi Mumbai) मतदार यादीतील (Voter List) घोटाळ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मनसे (MNS) प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे (Dr. Kailas Shinde) यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर तब्बल १५० मतदार नोंदवले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. 'हे आठवं आश्चर्य आहे, निवडणूक आयोगाचे अधिकारी डोक्यावर पडले आहेत का?,' असा संतप्त सवाल गजानन काळे यांनी केला आहे. याआधी नवी मुंबईत सार्वजनिक शौचालय आणि पाम बीच रोडवर (Palm Beach Road) बोगस मतदार नोंदणी झाल्याचे प्रकार समोर आले होते. आता चक्क आयुक्तांच्या नेरूळमधील (Nerul) सरकारी निवासस्थानाच्या पत्त्यावर बेलापूर (Belapur) मतदारसंघातील मतदार यादीत १२७ ते १५० जणांची नावे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही नावे प्रामुख्याने परप्रांतीय आणि अमराठी भाषिक नागरिकांची असल्याचा दावा मनसेने केला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात ९६ लाख बोगस मतदार असल्याचा मुद्दा उपस्थित केल्याचा संदर्भही यावेळी देण्यात आला.
महाराष्ट्र
Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार
Dharmendra Death News : धर्मेंद्र यांचं निधन,थोड्याच वेळात अंत्यसंस्कार : IANS वृत्त संस्था
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























