एक्स्प्लोर
Pune Ganshotsav 2023 : पुण्यात भरली उंदीर मामाची शाळा अन् बाप्पा मास्तरांची शिकवणी
पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की, देखाव्यांची परंपरा आली. मग त्यामध्ये हालते देखावे, जिवंत देखावे, धार्मिक, प्रबोधनात्मक, सामाजिक आदी विषयांवर देखावे सादर करण्याची मोठी परंपरा आहे.
Pune Ganshotsav 2023
1/8

पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की, देखाव्यांची परंपरा आलीच.
2/8

मग त्यामध्ये हालते देखावे, जिवंत देखावे, धार्मिक, प्रबोधनात्मक, सामाजिक आदी विषयांवर देखावे सादर करण्याची मोठी परंपरा आहे. घरगुती गणेशोत्सवही याला अपवाद नाही.
3/8

सुभाषनगरमधील जेधे कुटुंबाने असाच एक अफलातून देखावा सादर केला आहे.
4/8

जिथे उंदीरमामांची शाळा भरली असून, सर्व मूषक विद्यार्थी झाले आहेत, तर मास्तर बनले आहेत साक्षात 64 कलांची देवता असलेले गणपती बाप्पा!
5/8

सामाजिक कार्यकर्ते कान्होजी जेधे यांच्या घरी हा गणपती बाप्पाचा देखावा साकारला आहे.
6/8

पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा आणि शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणारा संदेश यातून देण्यात आला आहे.
7/8

शाडूच्या मातीपासून शिक्षकाच्या वेषातील गणपती बाप्पा, विद्यार्थी रूपातील मूषक, बाकडे, फळा, खडू, पेन्सिल अशा साहित्याचा वापर यात केला आहे.
8/8

शाळेच्या भिंतीवर विविध सामाजिक संदेश देण्यात आले आहेत.
Published at : 21 Sep 2023 09:20 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
धाराशिव
नाशिक
कोल्हापूर



















