एक्स्प्लोर

बीडमध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा, आंदोलक रस्त्यावर; ST प्रवर्गातील मागणीला खासदारांसह 6 आमदारांचा पाठिंबा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी एकमेकांच्या विरोधात उभा टाकलेले नेते बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं.

छ. संभाजीनगर : राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ देत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्याने बहुतांश मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे, ज्याप्रमाणे हैद्राबाद गॅझेटियरमध्ये मिळालेल्या नोंदीनंतर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून (OBC) आरक्षण देण्याचा जीआर काढला. त्याचप्रमाणे गॅझेटियर नोंदीचा संदर्भ घेऊन बंजारा समाजानेही एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. राज्यभरातून बंजारा समाज (Banjara community) एकटवत असून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. त्यातच, आज बीडमध्ये (Beed) बंजारा समाज मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा मोर्चा काढण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. बीडसह जालन्यातही आज बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी एकमेकांच्या विरोधात उभा टाकलेले नेते बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. बंजारा समाजाच्या आजच्या मोर्चाकडे राजकीय नेत्यांनी पाठ फिरवली आहे, मात्र बंजारा समाज मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाला आहे. राज्यातील मराठा आरक्षणाचा आंदोलनाचे केंद्रस्थान म्हणजे बीड. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना सर्वाधिक पाठिंबा मिळालेला जिल्हा म्हणजे ही बीड. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते, ओबीसी जनता, मराठा नेते, मराठा जनता येथे एकमेकांविरोधात उभा राहिलेला जिल्हाही बीड. या जिल्ह्यात बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच नेते एकवटलेले पाहायला मिळाले.

बीडमधील खासदारांसह 6 आमदारांचा पाठिंबा (MP and MLA support)

बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उघडपणे बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. धनंजय मुंडे बंजारा समाजासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. सुरेश धस , विजयसिंह पंडित नव्हे, तर जिल्ह्यातील सर्वच 6 आमदारांनी बंजारांच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसोबत उभं राहण्याची भूमिका घेतली आहे.

बीड जिल्ह्यात लोकसंख्या अडीच लाख

बीड जिल्ह्यात बंजारा समाजाची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात, तर एक लाख 90 हजार मतदार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारसंख्या असल्यानं कोणताही पक्ष या समाजाला नाराज करू शकत नाही. गेवराई विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाचं एकट्याचे तब्बल 63 हजार मतदार आहेत. त्यामुळे स्थानिक आमदार विजयसिंह पंडित यांनीही मोर्चाला उघड पाठिंबा दिला. जिल्ह्यातील 1286 लमाण तांडे समाजाच्या संघटनशक्तीचे द्योतक आहेत. याच ताकदीमुळे पंचायत समितीपासून जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत बंजारांचा प्रभाव निर्णायक ठरतो. माजलगाव आणि परळी मतदारसंघात तब्बल 70 हजार लोकसंख्या, त्यापैकी 50 हजार मतदार असल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे स्वतः मोर्चात सहभागी आहेत. बीड मतदारसंघात 30 हजार तर आष्टीत 20 हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे बंजारांना दुखावून कोणालाही राजकीय धक्का सहन करावा लागू शकतो. त्याचमुळे, मोर्चाला राजकीय नेत्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवल्याचं दिसून आलं.

आगामी निवडणुकांसाठी बंजारा समाजाचं मतदान निर्णायक

आगामी स्थानीक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाचा मोर्चा म्हणजे राजकीय नेत्यांसाठी मोठं आव्हान आहे. बंजारा समाजाचा पाठिंबा मिळाला, तर अनेक जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गणात विजय निश्चित मानला जातो. आमदार सुरेश धस, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनवणे यांना बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी पाठिंबा द्यायला काहीच अडचण नाही. कारण, हैदराबादमध्ये तशा नोंदी सापडलेल्या आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडे यांना या मोर्चात सहभागी होण्याला अडचण नव्हती. कारण, बंजारा समाज हा ओबीसीचा भाग आहे, याशिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावरून या पाठिंब्यानं अस्थिरतेचा भागही असू शकतो. मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीने महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना डगमगायला लावलं. मराठ्यांच्या मोठ्या लोकसंख्येमुळे आणि आंदोलनशक्तीमुळे सरकारला अखेर निर्णय घ्यावा लागला. आता तसंच चित्र बंजारा समाजाच्या आंदोलनात दिसत आहे. हैद्राबाद गॅझेटियरचा संदर्भ, मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी आणि बंजारांची लोकसंख्या या सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे बीडमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा राजकीय दृष्टीने अतिशय निर्णायक ठरत आहे

दरम्यान, बीडसह जालन्यातही बंजारा समाजाचा एल्गार पाहायला मिळाला, सध्या व्हेजेएनटी प्रवर्गात असलेल्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी हा महामोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा

मोठी बातमी! धाराशिवच्या 8 गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्रासाठी ताटकळावे लागणार, नोंदी शोधण्यासाठी सातारा गॅझेट लागणार?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Gold Silver Rate : चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
Embed widget