एक्स्प्लोर

मोठी बातमी! धाराशिवच्या 8 गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्रासाठी ताटकळावे लागणार, नोंदी शोधण्यासाठी सातारा गॅझेट लागणार?

धाराशिव जिल्ह्यातील आठ गावांमध्ये आता हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीत. या संदर्भातील सर्व पुरावे मोडी लिपीत उपलब्ध असून धाराशिवमधील कसबे तडवळा जिल्हा परिषद शाळेच्या नोंदीत

Dharashiv kunbi certificate: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी छेडलेलल्या आंदोलनानंतर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील आठ गावांना कुणबी प्रमाणपत्रासाठी ताटकळावे लागणार आहे . धाराशिव जिल्ह्यातील या गावांमध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद गॅझेटऐवजी सातारा गॅझेटचा संदर्भ घ्यावा लागणार आहे .

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मागणीनुसार, राज्य सरकारने  हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याचं जाहीर केलं आहे. त्या संबंधित जीआर (Government Resolution GR) देखील काढण्यात आला. मराठवाड्यासाठी (Marathwada Region) हैदराबाद गॅझेटियर (Hyderabad Gazetteer) महत्त्वाचं आहे. कारण मराठवाडा हा स्वातंत्र्यापूर्वी निझामाचा प्रांत होता. त्यामुळे त्याच्या ऐतिहासिक नोंदी या निझामाच्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये (Hyderabad Gazetteer Records) मिळतात.

नेमकं प्रकरण काय ?

धाराशिव जिल्ह्यातील आठ गावांमध्ये आता हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीत . आंबेजवळगा, कवडगाव, येडशी, जवळा, दुधगाव, कसबे तडवळा, गोपाळवाडी, कोंबडवाडी या गावांचा यात समावेश आहे .  1982 पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील या आठ गावांचा समावेश सोलापूर जिल्ह्यात होत होता .त्यानंतर ही गावं धाराशिव जिल्ह्यात समाविष्ट झाल्याने कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदींसाठी  अडचण निर्माण झाली आहे .  सोलापूर जिल्ह्यात समावेश होत असल्याने आता या आठही गावांमधील कुणबी नोंदणी शोधण्यासाठी सातारा गॅझेटचा संदर्भ घ्यावा लागणार आहे . हैदराबाद गॅझेट मध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांची माहिती असून सातारा गॅजेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आहे .

कसबे तडवळा शाळेत मोडी लिपीतील पुरावे

या संदर्भातील महत्त्वाचे सर्व पुरावे मोडी लिपीत उपलब्ध असून धाराशिव मधील कसबे तडवळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या नोंदीत हे दस्तऐवज असल्याची माहिती मिळाली आहे . कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर याविषयी माहिती स्पष्ट करून जनजागृती करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत .

कोणत्या गावांचा समावेश ?

आंबेजवळगा, कौडगाव, येडशी, दुधगाव, कसबे तडवळा, गोपाळवाडी आणि कोंबडवाडी ही आठ गावे यामध्ये समाविष्ट आहेत .या गावांचा 1982 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच सोलापूर जिल्ह्यात समावेश होता .त्यामुळे कुणबी नोंदणीसाठी सातारा गॅजेटचा आधार घ्यावा लागणार आहे .

मराठा आरक्षणासाठी गॅझेटियर का महत्त्वाचे?

गॅझेटियर्समध्ये अनेक ठिकाणी मराठा आणि कुणबी समाजाविषयी ऐतिहासिक नोंदी आहेत. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा–कुणबी यांच्यातील समानता, विवाह, शेतकरी जीवन याबद्दल नोंदी आहेत. त्यामुळे गॅझेटियर हे केवळ भूगोल–इतिहास नसून, आजच्या आरक्षण आणि सामाजिक वादांमध्ये महत्त्वाचा पुरावा ठरतो.

महत्त्वाच्या बातम्या

Kajalkath Yamini Dalvi: एबीपी माझाच्या प्रतिनिधी यामिनी दळवींच्या 'काजळकाठ' कवितासंग्रहाचा मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कारानं सन्मान
एबीपी माझाच्या प्रतिनिधी यामिनी दळवींच्या 'काजळकाठ' कवितासंग्रहाचा मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कारानं सन्मान
Dharashiv FDA Action: खव्याची बाजारपेठ असलेल्या धाराशिवमध्ये FDAची मोठी कारवाई! 325 किलो खवा जप्त; विक्रेत्यांचे धाबे दणाणले
खव्याची बाजारपेठ असलेल्या धाराशिवमध्ये FDAची मोठी कारवाई! 325 किलो खवा जप्त; विक्रेत्यांचे धाबे दणाणले
Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी चाल; सतीश चव्हाणांविरोधात प्रतापसिंह पाटील रिंगणात?
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी चाल; सतीश चव्हाणांविरोधात प्रतापसिंह पाटील रिंगणात?
Dharashiv News: घरातील सोनं विकून शेती केली, पदरी निराशा; 35 वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपवलं; संतप्त नातेवाईकांनी बॉडी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणली; धाराशिवमधील घटना
घरातील सोनं विकून शेती केली, पदरी निराशा; 35 वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपवलं; संतप्त नातेवाईकांनी बॉडी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणली; धाराशिवमधील घटना

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
Embed widget