एक्स्प्लोर

सोशल मीडियातून क्रांतीचा हुंकार! 1997 नंतर जन्मलेल्या तरुणाईनं चार वर्षात तीन देशातील भ्रष्ट सत्ता उखडून फेकली! नेपाळी तरुणाईनं महिला पीएम कशी निवडली?

1996 नंतर जन्मलेली (Gen Z protests worldwide) जनरेशन झेड मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडीयासोबत घडलेली अख्ख्या राजकीय वातावरणाला वेगाने बदलण्यास समर्थ ठरत चालली आहे.

Gen Z protests worldwide: गेल्या काही वर्षांपासून जगाच्या पाठीवर तरुणाई (ज्यामध्ये जनरेशन झेड (Gen Z revolution) सर्वाधिक सक्रिय आहे. विशेष करून 1996 नंतर जन्मलेली पिढी जनरेशन झेड समजली जाते.) प्रचलित राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत अत्यंत अस्वस्थ असल्याचे दिसून  येत आहे. त्यामुळे सोशल मीडियात (Social media revolution 2025) पाय रोवत असताना ही पिढी त्याच हत्यारांसोबत मोठी होत आहे. इतकेच नव्हे तीच सोशल मीडियातील हत्यार आता भ्रष्ट सत्ता सुद्धा उलथवून टाकत आहेत. गेल्या चार वर्षापासून भारताचा शेजारी सर्वाधिक होरपळत आहे. या यादीत हिमालयाच्या कुशीतील नेपाळची सुद्धा भर पडली आहे. सोशल मीडिया बंदीचा फतवा निमित्त ठरला, पण देशातील भ्रष्ट सत्ता आणि नेत्यांसह मुलांची अय्याशी देशातील तरुणाईच्या स्वप्नांवर आघात करणारी होती. त्यामुळे सोशल मीडिया बंदीची ठिणगी पेटली आणि सत्ता उलथवून टाकली. यामध्ये तीन पंतप्रधान बेघर झाले. अर्थमंत्र्याला रस्त्यावर ठोकले. संसद, सर्वोच्च न्यायालय सुद्धा पेटवून देण्यात आलं. त्यामुळे या तरुणाईची अस्वस्थता दिसून येते. 

जगाच्या पाठीवर जनरेशन झेडचा आक्रोश 

1996 नंतर जन्मलेली (Gen Z protests worldwide) जनरेशन झेड मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडीयासोबत घडलेली अख्ख्या राजकीय वातावरणाला वेगाने बदलण्यास समर्थ ठरत चालली आहे. ट्युनिशियाच्या गल्लीपासून ते नेपाळच्या चौकांपर्यंत, ते श्रीलंकेच्या गेटपासून  बांगलादेशच्या विद्यापीठांपर्यंत (Youth overthrow governments) दिसणारे आंदोलन हे एकच गोष्ट सांगतात, जेव्हा जेव्हा तरुणाई सडक्या राजकीय व्यवस्थेनं सतावली जाते तेव्हा क्रांतीची ठिणगी निश्चित आहे. त्यामुळे आजची तरुण पिढी म्हणजेच जनरेशन झेड जगभरातील राजकीय हालचालींचे केंद्रबिंदू होत आहे. ट्युनिशियापासून नेपाळपर्यंत, हाँगकाँगपासून श्रीलंकेपर्यंत या पिढीने दाखवून दिले की आंदोलने आता फक्त रस्त्यावर नाही, तर मोबाईलच्या स्क्रीनवरही पेट घेऊ शकतात.

सोशल मीडिया हेच दुधारी शस्त्र

फेसबुक-ट्विटरवर हॅशटॅग्स, टेलिग्राम-व्हॉट्सअ‍ॅपवरील गुप्त गट, इन्स्टाग्रामवर थेट प्रक्षेपण ही त्यांच्या हातातील नवीन शस्त्रे (Digital revolution youth power) आहेत. श्रीलंकेतील (Sri Lanka youth protests 2022) #GoHomeGota मोहीम असो वा नेपाळमध्ये झालेल्या आंदोलनांतून राजीनाम्याला भाग पाडलेला पंतप्रधान असेल, या दोन्ही ठिकाणी निर्णायक ठरले ते सोशल मीडियावर संघटित तरुण. ट्युनिशियामधील मोहम्मद बुआझिझीने पेटवलेला आत्मबलिदानाचा मशाल ज्या क्षणी फेसबुकवर जगभर पसरला, त्याच क्षणी अरब स्प्रिंगचा उदय झाला. हाँगकाँगमधील जोशुआ वाँगसारखे तरुण नेते आणि बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलने (Bangladesh student movement) हेच दाखवून देतात की इंटरनेटवर संघटित होणाऱ्या तरुणाईची ताकद किती प्रचंड आहे.

नेपाळी तरुणाईनं महिला पीएम कशी निवडली?

राजकारणात क्रांती नेहमी रस्त्यावर उसळलेल्या आंदोलकांच्या हातून होत असते, अशी आपली समजूत, पण नेपाळमध्ये आजच्या क्रांतींची सुरुवात रस्त्यावर नव्हे तर मोबाईलच्या स्क्रीनवर होते हे सिद्ध झालं. 1997 नंतर जन्मलेली तरुणाई सरकारच्या निर्णयाला इतका जबरदस्त प्रतिउत्तर देईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. सोशल मीडिया बंदी हीच ठिणगी ठरली. सरकारला वाटले की फेसबुक-इन्स्टाग्राम बंद केल्यावर आंदोलन थांबेल, पण हाच प्रयत्न अंगलट आला. डिस्कॉर्डवरील गुप्त ग्रुप्स, इन्स्टाग्राम स्टोरीज आणि हॅशटॅग्स आंदोलनाची नवी ध्वजफलके झाली. पक्षांच्या कार्यालयात नव्हे तर मोबाईल अ‍ॅप्सवरून आंदोलनाचं नियोजन झालं.

त्यामुळे चारच दिवसांत नेपाळ पेटला. 70 हून अधिक जीव गेले, शेकडो जखमी झाले, पण संतप्त तरुणाई थांबली नाही. त्यांनी राजकारण्यांचे ऐशोआरामाचे फोटो व्हायरल करून भ्रष्टाचाराचा चेहरा जगासमोर आणला. शेवटी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. तरुणाईनेच चर्चेतून सर्वोच्च नेत्याची निवड केली. सुशीला कार्की ज्या माजी सरन्यायाधीश आहेत, ज्यांची प्रतिमा पारदर्शकतेची होती.  अशा प्रकारे नेपाळला पहिल्यांदाच महिला पंतप्रधान मिळाली. ही फक्त सत्तांतराची कहाणी नाही, तर तरुणाई आता केवळ उद्याची मतदार नाही, तर आजची निर्णायक शक्ती आहे. त्यांच्या हातातील मोबाईल आता हत्यार आहे, त्यांच्या हॅशटॅग्स हे आता घोषणापत्र आहेत.

तरुणाई का अस्वस्थ आहे?

ही पिढी अस्वस्थ आहे कारण नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षण असूनही बेरोजगारी आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीमुळे भविष्य कोंडीत सापडले आहे. हवामान संकट, सामाजिक विषमता, डिजिटल सेन्सॉरशिप या सगळ्या जखमा अजून त्यांना खोलवर नेत आहेत. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका यांच्यासारख्या देशांत तरुणाईला भ्रष्ट सत्ताधाऱ्यांविरुद्ध बंड करावेसे वाटणे स्वाभाविकच आहे. तरुणाईच्या प्रश्नांकडे पाहण्याऐवजी बहुतेक नेते मलमपट्टी असेल किंवा मुस्कटदाबी करत सुटले आहेत. मलमपट्टी म्हणून एखादा मंत्री बदलणे, इंटरनेट बंद करणे, पोलिस दडपशाही करणे. पण दडपशाहीने तरुणाई अधिक पेटते. श्रीलंकेतील आंदोलन हेच उदाहरण. इंटरनेट बंद केल्यानंतर आंदोलन रस्त्यावर उफाळले. नेपाळमध्येही तसेच झाले. जनरेशन झेड ही फक्त भविष्यकाळाची नाही, तर वर्तमानकाळाची शक्ती आहे. ही तरुणाई तलवारीच्या टोकावर उभी आहे. राजकारणाला प्रश्न विचारते, उत्तरांची मागणी करते. ज्यांनी समस्यांकडे पाठ फिरवली, ते सत्तेतून कोसळले. म्हणूनच नेत्यांनी ही पिढी केवळ "मतदार" म्हणून नाही तर परिवर्तनाची खरी केंद्रबिंदू शक्ती म्हणून ओळखली पाहिजे. अन्यथा ही डिजिटल क्रांती कुठेही, कधीही सत्तेच्या खुर्च्यांना हलवू शकते. जनरेशन-झेडची अस्वस्थता फक्त भावनिक नसून ती संरचनात्मक आहे. मात्र देश आणि व्यवस्था कोणतीही असली, तरी मुद्दे समान आहे. शिक्षण घेतले तरी नोकरी नाही, कदाचित कंत्राटी कामे आणि तात्पुरती नोकरी. भविष्यातील आर्थिक सुरक्षा धूसर आहे. क्षमता न बघता घराणेशाही व राजकीय पटलावरील प्रस्थापित स्वार्थ सुद्धा कारणीभूत आहे. इंटरनेटमुळे अन्याय लगेच दिसतो; तशी तुलना केल्यावर असंवेदनशीलता तीक्ष्ण होते.

डिजिटल तरुणाईने काय दाखवले?

नेपाळ

महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात नेपाळी तरुणाईने फेसबुक-लाइव्ह आणि शॉर्ट-व्हिडिओच्या माध्यमातून आंदोलन झपाट्याने पसरवले. इंटरनेट बंद करण्याचे प्रयत्न देखील टिकले नाहीत; उलट, पंतप्रधानांवर दबाव वाढला आणि राजीनामा घ्यावा लागला.

श्रीलंका

आर्थिक व व्यवस्थापकीय अपयशाने झालेले दिवाळखोरीचे धक्के तरुणाईने ट्विटरवरचे #GoHomeGota सारखे हॅशटॅग वापरून आंदोलनाचे केंद्रस्थानी आणले. सोशल मिडियाने जागतिक लक्ष वेधले आणि दबाव वाढवला. अखेरीस नेतृत्वावर जबाबदारीची मागणी सफल ठरली.

बांगलादेश

विद्यार्थी चळवळीच्या व्हिडिओ आणि मेसेजेसने रस्त्यांवरील संघर्षाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवून दिला. सामाजिक न्याय, रस्ता सुरक्षा, रोजगार या मुद्यांवरची तरुणाईची मागणी अजूनही प्रलंबित आहे, पण संघटन क्षमतेत ती निर्विवाद मार्गदर्शक बनली आहे.

हाँगकाँग

लीडरलेस चळवळीचे यश दाखवणारा हा प्रयोग LIHKG आणि टेलिग्रामवरून रणनीती आखणारे तरुण सरकारच्या दडपशाहीचा सामना करत राहिले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
Embed widget