एक्स्प्लोर
Pune Accident News: वाढदिवसाची मिरवणूक; डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल अन्..., चिरडून एका तरूणाचा मृत्यू, सहा जण गंभीर
Pune Accident News: डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल होऊन ढोल पथकातील सात जणांना गाडीने चिरडले यात एका तरूणाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर रित्या जखमी झालेत.
Pune Accident News
1/9

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देव राम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल झाला.
2/9

या घटनेत ढोल पथकातील सात जणांना गाडीने चिरडले यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर रित्या जखमी झालेत.
3/9

या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आयोजक देवराम लांडे आणि चालकाला अटक करण्यात आली आहे.
4/9

ही घटना काल (बुधवारी दि.10) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जुन्नरमध्ये घडली. याप्रकरणी आयोजक देवराम लांडे, अमोल लांडे, डीजे मालक सौरभ शेखरे आणि चालक नामदेव रोकडे यांच्यावर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5/9

मिळालेल्या माहितीनुसार, देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर शहरात बुधवारी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत डीजे वाहन, ढोल-ताशा पथक आणि गोफनृत्य पथक सहभागी झाले होते.
6/9

खामगावजवळील शिवेचीवाडी येथील आदिवासी ठाकर समाजाच्या मुक्तादेवी तरुण मंडळाचे ढोल-ताशा पथक देखील या शोभायात्रेत सहभागी होते.
7/9

शोभायात्रा जुन्नर बाजार समितीतून धान्य बाजाराकडे येत असताना उतारावरती असतानाच डीजे वाहन ढोल-ताशा पथकातील युवकांच्या अंगावर आले. वाद्याच्या आवाजामुळे काहींना वाहन येत असल्याचं समजलं नाही.
8/9

त्यामुळे आदित्य काळेला डीजे वाहनाने फरफटत नेलं, तर गोविंद काळे, विजय केदारी, सागर केदारी, बाळू काळे आणि किशोर घोगरे हे या घटनेमध्ये जखमी झाले आहेत.
9/9

या घटनेची भीषणता या फोटोच्या माध्यमातून दिसून येत आहे, त्याचबरोबर तरूणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
Published at : 11 Sep 2025 02:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























