एक्स्प्लोर
PHOTO : बंजारा समाजाचा धडकी भरवणारा मोर्चा, ड्रोन दृश्यांनी लक्ष वेधलं
Jalna Banjara Morcha : जालना येथे बंजारा समाजाकडून एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावं, या मागणीसाठी महामोर्चा काढण्यात आला.
Jalna Banjara Morcha
1/10

जालना येथे बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
2/10

अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
3/10

हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.
4/10

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
5/10

मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
6/10

त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.
7/10

बंजारा समाज सध्या व्हीजेएनटी (ए) मध्ये आहे.
8/10

तर हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे.
9/10

त्यामुळे त्यांना एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी बंजारा समाजाची भूमिका आहे.
10/10

या मोर्चासाठी मोठ्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
Published at : 15 Sep 2025 02:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























