एक्स्प्लोर
Pune Drugs : पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीत 1100 कोटींच ‘म्यॅव म्यॅव’ जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यात तब्बल 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यात तब्बल 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 650 किलो पेक्षा अधिक वजनाचे मेफेड्रॉन म्हणजेच एमडी सापडले आहे.
1/10

या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे फक्त देशातच नसून इतर देशात देखील पोहोचलेले आहे याचा सखोल तपास सुरू आहे मात्र शिक्षणाच्या माहेर घरात एवढे किमतीचे ड्रग्स कोण आणतयं हा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होऊ लागला आहे.(Photo Credit : ABP Majha, Pune reporter )
2/10

पुणे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या गुंडांसह तिघांना अटक केल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदमात छापा टाकून तसचं कुरकुंभ मधून एकूण 1100 कोटी रुपयांपेक्षा आधिक मेफेड्रोन म्हणजेच एम डी जप्त केलं आहे. वैभव उर्फ पिंट्या भारत माने, अजय करोसिया आणि हैदर शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Photo Credit : ABP Majha, Pune reporter )
3/10

18 फेब्रुवारी: पुण्यात एम डी ड्रग्स विक्री केल्याप्रकरणी 3 जणांकडून तब्बल 4 कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त(Photo Credit : ABP Majha, Pune reporter )
4/10

19 फेब्रुवारी: पुण्यातील विश्रांतवाडी भागातील एका गोडाऊन मधून 55 किलो चे तब्बल 100 कोटी पेक्षा आढीक ड्रग्स जप्त(Photo Credit : ABP Majha, Pune reporter )
5/10

20 फेब्रुवारी: कुरकुंभ एम आय डी सी मधील एका कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा. एम डी तयार होत असलेल्या कारखान्यातून 550 किलो असा एकूण 1100 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.(Photo Credit : ABP Majha, Pune reporter )
6/10

20 फेब्रुवारी पुणे शहरा पाठोपाठ आता पिंपरी- चिंचवङमध्ये लाखो रुपयांच मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आलंय, पिंपरी- चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केलीय, मध्यरात्री जुना पुणे- मुंबई महामार्गावर या ड्रग्स ची तस्करी सुरू होती. शहजाद आलाम अब्बास कुरेशीला पोलिसांनी ताब्यात घेतलय, त्याच्याकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Photo Credit : ABP Majha, Pune reporter )
7/10

यातील हैदरने पुण्यातील विश्रांतवाडी भैरावनगर या परिसरात एका गोदामात मिठाच्या पोत्यात मेफेड्रोन लपविले होते. पोलिसांनी 100 ते 200 पोत्यांची तपासणी केली असता हैदरने मिठाच्या पोत्यात लपवलेले 50 किलो पेक्षा मेफेड्रोन मिळून आले.(Photo Credit : ABP Majha, Pune reporter )
8/10

कोणाला संशय येणार नाही अशा लोकवस्त्तीत हैदर ने हे गोदाम भाड्याने घेतलं होतं. ऑक्टोबर पासून हैदर याठिकाणी मिठाच्या पाकिटात ड्रग्स लपवून ठेवत असे.(Photo Credit : ABP Majha, Pune reporter )
9/10

पुण्याच्या पाठोपाठ कुरकुंभ एमआयडीसी येथील एका कारखान्यातून 550 किलो एम डीचा साठा जप्त करण्यात आला असून एकूण 650 किलो एम डी ज्याची किंमत 1100 कोटी रुपये एवढा मुद्देमाल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केला आहे. पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी हैदर शेख याला नायजेरीयन नागरिकाने एम डी ड्रग्स दिले होते.(Photo Credit : ABP Majha, Pune reporter )
10/10

या "प्रीमियम" एम डी ड्रग्स ची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत आहे. अंतराष्ट्रीय बाजारात 500 ग्रॅम एम डी ची किंमत तब्बल 1 कोटी रुपये इतकी आहे. आता या प्रकरणात अंतराष्ट्रीय धागेदोरे नेमके कुठले आहेत आणि नेमके हे ड्रग्स कुठून येतं होते आणि कोणाला याची विक्री केली जात होती याचा तपास सुरू असून राज्यातील विविध भागात पथकं रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली.(Photo Credit : ABP Majha, Pune reporter )
Published at : 20 Feb 2024 06:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion