एक्स्प्लोर
हदगाव येथील तलाव पक्षांनी फुलला; 20 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी या तलावावर वास्तव्यास, पक्षीप्रेमींची मांदियाळी
Parbhani : सध्या परभणीच्या सेलू तालुक्यातील हदगाव येथील तलाव विविध पक्षांनी फुलला, पक्षी निरीक्षक आणि पक्षी प्रेमींची मांदियाळी बघायला मिळत आहे.
Hadgaon lake
1/12

परभणीच्या सेलू तालुक्यातील हदगाव येथील तलाव पक्षांनी फुलला आहे. (फोटो सौजन्य : विजय ढाकणे)
2/12

20 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी या तलावावर वास्तव्यास आहेत. (फोटो सौजन्य : विजय ढाकणे)
3/12

पक्षांचे सुंदर छायाचित्र टिपले आहेत पक्षी निरीक्षक विजय ढाकणे यांनी
4/12

सेलूपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या हदगाव परिसरात 8 मोठ्या खदानी आणि एक तलाव आहे. (फोटो सौजन्य : विजय ढाकणे)
5/12

या तलावातील पाणी उथळ असून बेशरम, लव्हाळाचे बरेचसे बेट यामध्ये आढळून येतात (फोटो सौजन्य : विजय ढाकणे)
6/12

वेगवेगळ्या प्रकारच्या पान वनस्पती असल्याने या पक्ष्यांना खाद्य आणि पाणी उपलब्ध होत असल्याने पक्षांची गर्दी इथं पाहायला मिळते (फोटो सौजन्य : विजय ढाकणे)
7/12

याचप्रमाणे पक्षांच्या पुढच्या पिढ्यांना जन्म देण्याच्या दृष्टीने आवश्यक अधिवास येथे उपलब्ध असल्याने शेकडो वारकरी, छोटे अडई बदक याठिकाणी कायम वास्तव्य करताना आढळून येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. (फोटो सौजन्य : विजय ढाकणे)
8/12

या तलावात आढळणारे इतर पक्षी वारकरी (Common Coot), Lesser Whistling Duck), छोटा खंड्या (Common Kingfisher), जांभळी पाणकोंबडी (Purple Moorhen) साधी पाणकोंबडी (White breasted Swamphen) नदी सुरय (River Tern), हळदी कुंकू बदक (Spot billed duck) (फोटो सौजन्य : विजय ढाकणे)
9/12

तसेच छोटा पाणकावळा (Little Cormorent), जांभळा बगळा (Purple Heron), राखी बगळा (Grey Heron), टीबुकली (Little Grebe), टिटवी (Red Wattled Lawpwing), लालसरी (Common Pochard) आदी सह इतर अनेक पक्षी याठिकाणी आढळून येत असल्याची माहिती पक्षी निरीक्षक विजय ढाकणे यांनी दिली. (फोटो सौजन्य : विजय ढाकणे)
10/12

अधिवास चांगला असल्याने पक्ष्यांची जत्रा या तलावातील बेशरम आणि लव्हाळाची बेट पाणपक्ष्यांना घरटे बनवण्यासाठी उपयोगी पडतात. (फोटो सौजन्य : विजय ढाकणे)
11/12

तसेच या तलावात पाणवनस्पती मोठ्या प्रमाणात असल्याने या पक्ष्यांना खाद्य मुबलक उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य : विजय ढाकणे)
12/12

एकंदरीत अधिवास चांगला असल्याने अनेक पाणपक्ष्यांची रेलचेल येथे पहावयास मिळते. (फोटो सौजन्य : विजय ढाकणे)
Published at : 24 Mar 2023 01:08 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















