एक्स्प्लोर
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Mahashivratri 2023 Parbhani
1/10

राज्यभर महाशिवरात्रीचा उत्साह दिसत आहे. महाशिवरात्री निमित्त परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
2/10

परभणीतील पारदेश्वर हे देशातील सर्वात मोठ्या पाऱ्याचे शिवलिंग मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी देखील मोठी गर्दी झाली आहे.
3/10

परभणीच्या पारदेश्वर महादेव मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
4/10

दर्शनासाटी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे.
5/10

251 किलोचे पाऱ्याचे शिवलिंग आहे. शिवलिंगावर पंचधातूंचा भव्य नाग, प्रवेशद्वारावर 80 फूट उंच आणि आकर्षक अशी स्वागत कमान या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
6/10

सर्वसाधारण वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर पारा हा धातू वितळतो. मात्र याच पाऱ्याचे देशातील सर्वात मोठे म्हणजेच 251 किलो पाऱ्यापासून बनवलेले शिवलिंग मंदिरात आहे.
7/10

परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिर हे पाऱ्यापासून बनलेले राज्यातील एकमेव मंदिर असून देशातील सर्वात मोठे मंदिर आहे
8/10

महाशिवरात्री निमित्तानं रात्री बारा वाजल्यापासूनच इथे भाविक दर्शनासाठी येत होते आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणावर भक्तांनी मंदिरात गर्दी केली आहे.
9/10

आज सकाळी 10 वाजता इथे पारदेश्वराचा अभिषेक पार पडला तसेच दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम इथे पार पडले.
10/10

परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिरात शिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पारदेश्वर हे देशातील सर्वात मोठ्या पाऱ्याचे शिवलिंग मंदिर आहे.
Published at : 18 Feb 2023 01:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























