एक्स्प्लोर
Palghar Warli Painting : पालघरमधील सूर्या नदीचा प्रसिद्ध भीम बांध वारली पेंटिंगने सजला
सूर्या नदीवरील भीम बांधाची ओळख कायम राहावी आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पालघरमधील वाघाडी येथील तरुणांनी एकत्र येत भल्या मोठ्या दगडांवर वारली चित्रकला साकारण्यास सुरुवात केली आहे.
Palghar Bhim Dam Warli Painting
1/9

पांडवकालीन दंत कथेत उल्लेख असलेल्या भीम बांधाची सध्या अनेक ठिकाणी झीज सुरु आहे. गुजरातपासून पालघर, ठाणे, रायगड या भागात एका सरळ रेषेत मोठे दगड एकमेकांवर असून याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये भीम बांध असा केला आहे.
2/9

मात्र या ऐतिहासिक वास्तूकडे सध्या पुरातत्व विभागानेही दुर्लक्ष केलं असून या भीम बांधाची ओळख कायम राहावी आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पालघरमधील वाघाडी येथील तरुणांनी एकत्र येत भल्या मोठ्या दगडांवर वारली चित्रकला साकारण्यास सुरुवात केली आहे.
3/9

पांडव अज्ञातवासात असताना कोल्हापूरची महालक्ष्मी माता गुजरातकडे जात होती. याच वेळेस तिला पालघरमधील डहाणूतील निसर्गरम्य परिसर आवडला. त्यामुळे ती डहाणूतील विवाळवेढे येथे एका डोंगरावर वास्तव्यास होती. पुढे या गावाला महालक्ष्मी असं नाव सध्या या ठिकाणी महालक्ष्मी मातेचं प्रसिद्ध असलेले मंदिर आहे.
4/9

भिमाची नजर महालक्ष्मी मातेवर पडली आणि भीमाने महालक्ष्मी मातेला आपल्याशी विवाह करण्याचा आग्रह धरला. मात्र माझ्याशी विवाह करायचा असेल तर सूर्या नदीचे पाणी सकाळपर्यंत माझ्या गावापर्यंत वळव, अशी अट महालक्ष्मी मातेने भीमा समोर ठेवली. त्यासाठी भिमाने गुजरातपासून पालघर, ठाणे, रायगडपर्यंत हा बांध उभारला असल्याची दंतकथा सांगितली जाते.
5/9

हा भीम बांध अगदी गुजराती, पालघर, ठाणे, रायगड या परिसरात सॅटेलाईटद्वारे एका सरळ रेषेत दिसून येतो. पालघरमधील सूर्या नदीला हा बांध वाघाडी इथे दुभागच असून या ठिकाणी आकर्षक असं पर्यटन स्थळ आहे. मात्र सध्या या पौराणिक वास्तूकडे दुर्लक्ष झाल्याने या भीम बांधाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.
6/9

या भीम बांधाची ओळख कायम राहावी आणि गावातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा म्हणून डहाणूतील वाघाडी येथील तरुणांनी एकत्र येत या भीम बांधावरील भल्या मोठ्या दगडांवर वारली चित्रकला साकारुन पर्यटकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
7/9

सातासमुद्रपार गेलेली वारली चित्रकला या दगडांवर साकारण्यात आली असून यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळून स्थानिक तरुणांना ही रोजगार मिळेल, असा विश्वास येथील तरुणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
8/9

भीम बांधाची रंगरंगोटी केल्याने परिसरातील पर्यटक ही आता येथे आकर्षित होऊ लागले आहेत. परिसरातील पर्यटक सध्या या पर्यटन स्थळावर गर्दी करत असून येथे साकारलेल्या वारली चित्रकलेमुळे चिमुकल्या मुलांनाही या पर्यटनस्थळाचा आकर्षण वाटू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे
9/9

इतिहासातील अनेक दंतकथांमध्ये या भीम बांधाचा उल्लेख असून सध्याच्या भीम बांधाच्या दुरावस्थेकडे पुरातत्व विभागही दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांनी एकत्र येत हा पुढाकार घेतला असला तरी पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष देऊन या भीमबंधाची ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Published at : 05 Apr 2023 09:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























