एक्स्प्लोर
भरधाव कंटेनरची कारला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी, कारचा अक्षरश: चक्काचूर मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात
अपघात इतका भयानक होता की डस्टर कार चक्काचूर झाली. दुर्घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Palghar Accident
1/7

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटात भीषण अपघात झाला आहे.
2/7

गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव डस्टर कारला मागून कंटेनरने जोरदार धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, तर तीन जखमी आहेत.
3/7

मृतांमध्ये दोन महिला असून, जखमींमध्ये एका चिमुकल्या मुलाचा समावेश आहे. अपघात इतका भयानक होता की डस्टर कार चक्काचूर झाली.
4/7

पोलीस आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास सुरू आहे.
5/7

दुर्घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पालघरच्या मनोर पोलीस ठाणे हद्दीत झाली आहे.
6/7

अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पंचनामा सुरु केला आहे.
7/7

अपघात झालेली कार क्रेनने हटवण्यात येत आहे.
Published at : 31 May 2025 01:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























