एक्स्प्लोर
Nandurbar Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा फटका! पपई, केळी जमीनदोस्त; जनावऱ्याचे चाऱ्यासाठीही हाल
Unseasonal Rain in Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सलग अवकाळी पावसाने कहर केला असून मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं आहे.

Unseasonal Rain in Nandurbar
1/11

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीसाठी आलेली पपई, केळी जमीनदोस्त झाली आहेत.
2/11

वकाळी पावसाने कहर केला असून मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं आहे. शेतीचे नुकसान प्रचंड असून प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू झाले आहेत.
3/11

पण, दररोज होणाऱ्या पावसामुळे नुकसानाच्या क्षेत्र वाढतच आहे, परिणामी पंचनामे होण्यास विलंब होत आहे. तर, दुसरीकडे सरकारने पंचनामे यांचा फास न ठेवता सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
4/11

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे.
5/11

काढणीसाठी आलेली पपई, केळी जमीनदोस्त झाली आहेत. तर, कापूस, मिरची, कापणी केलेला भात आणि गुरांसाठी असलेला चारा सारकही अवकाळीमुळे हातातून गेलं आहे.
6/11

प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत आहेत. पण, सरकारने पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
7/11

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान असलं तरी पंचनामे करून काय उपयोग असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.
8/11

पंचनामे केल्यानंतर वेळेवर मदत मिळणार नाही, असं म्हणत शेतकऱ्यांनी सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
9/11

दुष्काळ जाहीर होऊनही विम्याची अग्रीम मिळत नाही तर, अवकाळीची नुकसानभरपाई कधी मिळेल, त्यामुळे सरकारने सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
10/11

नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपई बागायतदार रडकुंडीला आले आहेत.
11/11

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे उभी पिकं झोपून गेली आहेत.
Published at : 03 Dec 2023 02:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion