PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण
PM Narendra Modi on Bihar Election Result 2025 : फिर एक बार एनजडीए सरकार हे बिहारच्या जनतेने दाखवून दिल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी व्यक्त केले. बिहारच्या जनतेने समृद्ध भारतासाठी मतदान केले आहे. बिहारच्या जनतेने सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. बिहारच्या जनतेने विकासाला मतदान दिले आहे. मी एनडीच्या सर्व दलांकडून बिहारच्या महान जनतेचे आभार मानतो असे नरेंद्र मोदी म्हणाले. लोहा लोहे को काटता है, बिहारमध्ये काही दलांनी माय फॉम्युला तयार केला होता. मात्र, आजच्या विजयाने नवीन सकारात्मक महिला आणि युश हा फॉर्म्युला दिला आहे.
बिहारच्या जनतेने महिला आणि युथ हा फॉर्म्युला दिला
जयप्रकाश नारायण, करपूरी ठाकूरजी यांना प्रणाम करतो. करपूरी ठाकूरजी यांच्या गावापासून मी बिहारमधील प्रचाराला सुरुवात केली होती. बिहारच्या विकासाला नवीन उंचीवर आम्ही घेऊन जाणार आहोत. लोहा लोहे को काटता है, बिहारमध्ये काही दलांनी माय फॉम्युला तयार केला होता. मात्र आजच्या विजयाने नवीन सकारात्मक महिला आणि युथ हा फॉर्म्युला दिला आहे. आज बिहार देशातील या राज्यात आहे की, सगळ्यात जास्त युवकांची संख्या आहे. यामध्ये प्रत्येक धर्म जातीचे युवक आहेत. त्यांनी जंगलारजला पूर्णपणे संपवलं आहे. युवकांचे आभा. शेतकरी सर्व व्यवसायिकांचे आभार, एनडीएच्या सर्व दलांचे आभार, नितीश कुमार शानदार नेतृत्व दिले. आजची विजय हा लोकशीहीचा विजय आहे.
























