एक्स्प्लोर

MIM Bihar MLA List : गेल्यावेळी आमदारांनी अर्ध्यात साथ सोडली, ओवेसींनी बिहारमध्ये पुन्हा ताकद लावली, एमआयएमचे नव्या विधानसभेत किती आमदार?

Bihar Assembly Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं प्रचंड बहुमत मिळवलं आहे. असदुद्दीन ओवेसींच्या एमआयनं देखील बिहारमध्ये निवडणूक लढवली होती.

Bihar MIM MLA List  नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात एनडीएनं बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवलं आहे. भाजप सध्याच्या आकडेवारीनुसार 89 जागांवर आघाडीवर आहे, त्यापैकी 77 जागांवर विजय मिळवला आहे. तर, जदयू 85 जागांवर आघाडीवर असून त्यांच्या 63 उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.

ऑल इंडिया मजलीसइत्तेहादूल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएनं बिहार विधानसभा निवडणुकीत 2020 च्या निवडणुकीप्रमाणं यंदाही सहभाग घेतला होता. एमआयएमनं गेल्या निवडणुकीप्रमाणं यावर्षी देखील कामगिरी केली आहे.

असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला सीमांचल भागातून 5 जागांवर विजय मिळाला होता. यंदा त्याच भागात एमआयएमनं पुन्हा दमदार कामगिरी केली आहे.

एमआयएमनं बिहारमधील चार जिल्ह्यातील 24 विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले होते. अरारिया, कटिहार, कृष्णगंज आमि पूर्णिया या जिल्ह्यांमध्ये एमआयएमनं निवडणूक लढवली. या जिल्ह्यातील मतदारासंघांमध्ये मुस्लीम समाजाची लोकसंख्या अधिक संख्येनं आहे.

एमआयएमला कोणत्या मतदारसंघात विजय मिळाला?

जोकीहाट, बहादूरगंज, कोछधमन, अमौर आणि बैसी या पाच विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत.

चोकीहाट विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे मोहम्मद मुर्शीद आलम यांनी जदयूच्या मंझर आलम आणि शहनवाझ यांचा पराभव केला. जनुसराजचे सरफराज आलम तिसऱ्या स्थानी राहिले. तर राजदचे शहानवाझ चौथ्या स्थानावर फेकले गेले. मोहम्मद मुर्शीद आलमन यांना 83737 मतं मिळाली. त्यांनी 28803 मतांनी विजय मिळवला.

बहादूरगंज विधानसभा मतदारसंघात मोहम्मद तौसिफ आलम यांनी काँग्रेसच्या मोहम्मद मसावार आलम यांना 28726 मतांनी पराभूत केलं.

कोछधामण विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद सरवार आलम यांनी राजदच्या मुजाहिद आलम यांचा पराभव केला. एमआयएमच्या सरवार आलम यांना 81860 मतं मिळाली. काँग्रेसच्या मुजाहिद आलम यांना 58839 मतं मिळाली. भाजपच्या बिना देवी यांना 44858 मतं मिळाली.

अमौर विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे अख्तरुल इमान यांनी जनता दल संयुक्तच्या सबा जफार यांना पराभूत केलं. एमआयएमचे उमेदवार या मतदारसंघात 38928 मतांनी विजयी झाले. अख्तरुल इमान यांना 100836 मतं मिळाली.

बैसी विधानसभा मतदारसंघात गुलाम सरवर यांनी भाजपच्या विनोद कुमार यांचा पराभव केला. या मतदारसंघात राजदचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले. गुलाम सरवर यांना 92766 मतं मिळाली. तर, विनोद कुमार यांना 65515 मतं मिळाली.

बिहारमधील यशाबाबत ओवेसी काय म्हणाले?

असदुद्दीन ओवेसी यांनी सीमांचलच्या लोकांचे आभार मानले आहेत. एमआयएमच्या 5 उमेदवारांनी विजयी केल्याबद्दल आभार मानतो, असं ओवेसी म्हणाले. सीमांचलसाठी 11 वर्षांपासून लढा सुरु केला आहे, तो अजूनही सुरु आहे, असं ओवेसी म्हणाले. बिहारमध्ये एनडीए जिंकेल अशी आशा होती, मात्र 200 जागा मिळतील असा अंदाज नव्हता. बिहारच्या जनतेचा जनादेश आपण मनापासून स्वीकारला पाहिजे, असं ओवेसींनी म्हटलं. यावेळी त्यांनी नितीशकुमार यांचं देखील अभिनंदन केलं.

दरम्यान, 2020 च्या विधानसभा निवडणकीत एमआयएमचे पाच आमदार निवडून आले होते. त्यापैकी चार आमदारांनी 29 जून 2022 ला एमआयएमची साथ सोडत राजदमध्ये प्रवेश केला होता. त्यावरुन अनेकदा असदुद्दीन ओवेसी यांनी राजदवर टीका केली होती. मात्र, 2025 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमनं पुन्हा 24 उमेदवार उभे करत 5 जागांवर विजय मिळवला आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget