एक्स्प्लोर
Nanded : ओसंडून वाहणारा शेख फरीदबाबा धबधबा पर्यटकांना खुणावतोय, पाहा फोटो
Baba Sheikh Farid Waterfall : मागील काही दिवसांत नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाल्यांना पुर आले आहे. तर अनेक छोटे-मोठे धबधबे ओसंडून वाहत आहे.

Baba Sheikh Farid Waterfall
1/9

नांदेडच्या माहूर शहरापासून 12 किलोमिटर अंतरावर असलेला शेख फरीद वझरा धबधबा ओसंडून वाहत आहे.
2/9

जोरदार पाऊस झाल्यावर दरवर्षी हा धबधबा ओसंडून वाहत असतो, त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते.
3/9

डोंगरदऱ्यात असल्याने आणि आजुबाजुला निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटकांसाठी हा धबधबा पर्यटनस्थळ बनले आहे.
4/9

तर सततच्या पावसाने तीर्थक्षेत्र माहूर इथल्या वनराईने हिरवागार शालू परिधान केलाय. त्यात माहूर शहराजवळच्या शेख फरीद दर्गाह इथला धबधबा मोठ्या वेगाने प्रवाहित झालाय.
5/9

डोंगर दऱ्यातील पर्वतरांगांच्या कुशीतून नैसर्गिकरित्या हा धबधबा निर्माण झालेला आहे.
6/9

शंभर फुटाच्या उंच दरीतून कोसळणारा हा धबधबा नयनरम्य असाच आहे.
7/9

उंच डोंगरावरून कोसळणारे तुषार अंगावर झेलण्यासाठी इथे स्थानिकांनी गर्दी करतांना पाहायला मिळत आहे.
8/9

अत्यंत दुर्गम भागात असलेला या धबधब्याच्या जागी सुविधा निर्माण केल्यास पावसाळी पर्यटनाचे हे एक चांगले ठिकाण होऊ शकते, मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतय.
9/9

विशेष म्हणजे आई रेणुका मातेच्या मंदिरापासून हा धबधबा अवघ्या आठ किलोमिटर अंतरावर असल्याने भाविक या ठिकाणी गर्दी करतांना दिसतायत.
Published at : 30 Jul 2023 06:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
