एक्स्प्लोर
Advertisement

मोबाईलला रेंज नाही, इंटरनेटचा पत्ता नाही; सुविधांची वाणवा असलेल्या नांदेडमधील दुर्गम भागातील झेडपी शाळेची कमाल कामगिरी
मोबाईलला रेंज नाही, इंटरनेटचा पत्ता नाही; सुविधांची वाणवा असलेल्या नांदेडमधील दुर्गम भागातील झेडपी शाळेची कमाल कामगिरी

Nanded kinvat pangar pahad zp school
1/9

जिथं टीव्ही नाही, फोनला नीट रेंज नाही, इंटरनेटचा पत्ता नाही अशा एका गावातील झेडपी शाळेच्या यशाचं सध्या कौतुक होत आहे.
2/9

भौतिक सुविधांपासून वंचित असलेल्या नांदेडमधील पांगरपहाड गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती व शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
3/9

किनवट तालुका मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असणाऱ्या पांगरपहाड गावच्या जिल्हा परिषद शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100 लागला आहे.
4/9

डोंगर माथ्यावर शहरापासून दूर असणाऱ्या आणि तंत्रज्ञान युगातही मोबाईल, इंटरनेट तर सोडा पण टीव्हीही नसणाऱ्या गावाने शैक्षणिक प्रगती करून वेगळा आदर्श घालून दिला आहे.
5/9

किनवट तालुका मुख्यालयापासून 60 किलोमीटर अंतरावर आदिवासी बहुल, तेलंगणा सीमेवरील अतिदुर्गम क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांचा हा प्रगतीचा आलेख आहे.
6/9

डोंगर माथ्यावर, दरीखोऱ्यात वसलेल्या पांगरपहाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
7/9

पांगरपहाड येथील शाळेसह शिष्यवृत्ती परीक्षेचाही निकाल 100 टक्के लागला आहे.
8/9

ज्यात सहापैकी सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या शाळेतील कार्तिक विनोद जाधव, अक्षय जितेश जाधव, गायत्रीदेवी सुनील जाधव, अस्मिता रवींद्र राठोड हे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून तनवी संतराम जाधव व कृष्णा विक्रम जाधव शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
9/9

त्यामुळे विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. कोविड काळात शाळा ऑनलाइन झाल्या पण ज्याठिकाणी इंटरनेटच नाही, अशा पांगरपहाड सारख्या गावात, कोविड सारख्या परिस्थितीवर मात करत सुविधांचा अभाव असतानाही गुणवत्ता न ढसाळता विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवलं आहे. या गावात रस्ते,रोड,नाल्या,आरोग्य केंद्र या भौतिक सुविधाही नाहीत. ज्या गावातून भ्रमण ध्वनीवरून संदेश द्यायचा असेल तर पाण्याच्या टाकीवर चढावं लागतं, तेव्हा कसाबसा संपर्क होतो. अशा ठिकाणी ना टीव्ही, ना नेट, ना मोबाईल नेटवर्क, परंतु तरीही येथील शैक्षणिक गुणवत्ता उच्च कोटीची ठरलीय. या गावासह तिथले विद्यार्थी आणि शिक्षकाचं आज सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
Published at : 15 Jan 2023 07:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
