एक्स्प्लोर

अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार

जे पाशवी बहुमत भाजपला मिळालं आहे, भाजपला नगरपालिकामध्ये मिळालेले हे यश अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे.

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप (BJP) महायुतील मोठं यश मिळालं असून भाजपने सुमारे 120 नगरपालिकांवर आपला झेंडा रोवला आहे. भाजपच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे, अभूतपूर्व यश भाजपला मिळालं असून आता मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपा महायुती सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यावर, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी प्रखर शब्दात टीका केली असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जल्लाद असल्याचं त्यांनी म्हटलं. जे पाशवी बहुमत भाजपला मिळाला आहे, नगरपालिकांमध्ये मिळालेले हे यश अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी  धोक्याचा इशारा आहे. कारण, सोबत घेतलेल्या प्रत्येक मित्रपक्षाचा घात करणे हा भाजपचा स्वभाव आहे, असेही सपकाळ यांनी म्हटले. 

जे पाशवी बहुमत भाजपला मिळालं आहे, भाजपला नगरपालिकामध्ये मिळालेले हे यश अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. प्रत्येक सोबत घेतलेल्या मित्र पक्षाचा घात करणे हा भाजपचा स्वभाव आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थामधील विजयाच्या निकालानंतर काँग्रेसकडून भाजपवर पहिल्यांदाच वार करण्यात आला. 2029 च्या निवडणुकीत हे दोघेही पक्ष भाजपसोबत दिसणार नाहीत, देवेंद्र फडणवीस एक जल्लाद आहेत. म्हणूनच त्यांच्यातला एक पक्ष विरोधकांशी हातमिळवणी करण्यासाठी निघाला आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्‍यांवर केली. 

महापालिकेबाबत स्थानिक नेत्यांना अधिकार

महापालिकेच्या निवडणुकीतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाला आम्ही अधिकार दिले असून इंडिया अलायन्ससोबतच वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी संघटना यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. तसेच, होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस पक्ष जिंकेल, असा विश्वास देखील सपकाळ यांनी व्यक्त केला.

माणिकराव कोकाटेंना सरकार वाचवतंय

राहुल गांधी यांचे सदस्यत्व काही तासात रद्द होते, सुनील केदार यांची देखील आमदारकी रद्द केली जाते. मात्र रम्मीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या माणिकराव कोकाटे यांची सुरक्षा प्रशासन करताना दिसत आहे. कोकाटेंची सोय होईल अशा वातावरणाची निर्मिती पोलिसांनी केली. तसेच त्यांना बेल मिळावी यासाठी सरकार गप्प बसलं होतं. भारतीय जनता पक्ष हा ना खाऊंगा, ना खाने दूंगा या धर्तीवर काम करत नाही. याउलट, मिल बाटके सब खाओ  अशी त्यांची भूमिका आहे. एका मंत्राला वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाचा सुरू आहे, अशीही टीका माणिकराव काकाटे यांनी केली. 

हेही वाचा

धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget