Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
ठाकरे बंधूंची युतीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. प्रवक्ते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे बंधूंना येणाऱ्या निवडणुकांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मागील ६ महिन्यापासून ते युतीतच आहेत पण निवडणुकांचे निकाल १ अंकी लागले यावरून लक्षात घ्या, त्यांचे आव्हान आम्हाला नाही, उद्या युती जाहीर झाल्यानंतर आपण बोलू, असे नरेश म्हस्के म्हणाले आहेत. सोबतच ठाण्यातील जागा वाटप रखडले असल्याने भाजपने स्वबळाची तयारी केल्याच्या बातमीवर, आमच्या चर्चा सकारात्मक आहेत, लवकरच जागा वाटप जाहीर होईल असेही ते म्हणाले आहेत. त्यांच्या सोबत माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देखील आम्ही एकत्र युतीत लढू, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी….
आजच्या महत्वाच्या बातम्या - 23 DEC 2025
पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्याच्या एकीची पॉवर दिसणार, २६ तारखेला एकीची अधिकृत घोषणा, खुद्द अजित पवारांची माहिती...चर्चा सुरू असल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा...
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद... पवारांचे निष्ठावान प्रशांत जगताप राजीनाम्याच्या वाटेवर... तर अजित पवारांसोबत जाण्यावरुन काँग्रेसमध्येही दोन मतप्रवाह...
उद्धव आणि राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची उद्या दुपारी १२ वाजता औपचारिक घोषणा, वरळीतील कार्यक्रमाकडे महाराष्ट्राच्या नजरा... मुंबई, पुण्यासह ७ महापालिकांमध्ये ठाकरेंची हातमिळवणी
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काँग्रेसचा सूर बदलला...आघाडीची वेळ निघून गेल्याचं सांगणाऱ्या काँग्रेसची चर्चेची तयारी...तर उद्याच्या पत्रकार परिषदेला पवार हजर राहिले तर आवडेलच, राऊतांचं वक्तव्य...
प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची भूमिका अद्याप गुलदस्त्यात, मुंबईत आंबेडकरांकडून ५० टक्के जागांची मागणी, वंचित काँग्रेससोबत जाणार की स्वतंत्र लढणार? पेच कायम



















