एक्स्प्लोर
उमरेडच्या ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट; 7 ते 8 कामगार जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
Nagpur umred fire in company
1/7

नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
2/7

स्फोटानंतर कंपनीत आग लागल्याने या दुर्घटनेत 7-8 जण गंभीर जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
3/7

संबंधित कंपनी अल्युमिनियम फॉइलची असल्याने स्फोटानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत
4/7

कंपनीत काही कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात असून अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
5/7

महत्वाचे म्हणजे या कंपनीमध्ये अल्युमिनियम पावडर असल्याने आग विझवताना अडचणी येत आहेत. दरम्यान, आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही.
6/7

पावडर जाळून खाक झाल्यानंतरच संपूर्ण आग आटोक्यात येईल, अशी माहिती उमरेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली
7/7

दरम्यान, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होताच स्थानिकांनी देखील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले
Published at : 11 Apr 2025 09:52 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
नाशिक
पुणे
व्यापार-उद्योग


















