एक्स्प्लोर
Assembly Winter Session: सत्ताधाऱ्यांचे टाळ वाजवून भजन तर विरोधकांकडून 'पन्नास खोके भूखंड ओक्के'च्या घोषणा
नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीचे सत्र सुरु होण्यापूर्वी सत्ताधारी भाजप-शिंदे गटाचे आमदार आणि विरोधक पुन्हा आमने सामने आले.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या.
1/11

महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
2/11

बोगस आदिवासी कायम करून खऱ्या आदिवासींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध, असे फलक घेऊन अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी विधानभवन परिसरात नारेबाजी केली. सरकारचा जाहीर निषेध असो अशा आशयाचे फलक गळ्यात लटकवून त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली.
3/11

राज्य सरकारच्या मनमानी काराभाराविरोधात महाविकास आघाडीचे आमदार एकत्र आले होते.
4/11

विधान भवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकार विरोधात सुरु असलेल्या निदर्शनांमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले होते.
5/11

विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना, कॉंग्रेस नेत्यांसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचीही उपस्थिती होती.
6/11

मविआच्या घोषणांना प्रत्युत्तर देत शिंदे - भाजप सरकारच्या आमदारांनीही टाळ वाजवून भजन केले.
7/11

विरोधक एकत्र पायऱ्यांवर घोषणा देत असताना अचानक सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आमदारांनी माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला.
8/11

नागपूर सुधार प्रन्यासने दिलेल्या भूखंडांचा मुद्दा आजही विधानभवनात आणि पायऱ्यांवर गाजला.
9/11

राज्य सरकार आणि विरोधकांनी एकाच वेळेस एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याने माध्यमांचीही तारांबळ उडाली.
10/11

नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपातील गैरव्यव्हाराचे आरोप करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी मविआच्या आमदारांनी केली.
11/11

विठ्ठलाचे नाही धरले पाय, मविआचे करायचे काय, असे फलक सत्ताधारी आमदारांच्या हातात होते.
Published at : 21 Dec 2022 07:24 PM (IST)
आणखी पाहा






















