कोल्हापूरसारखी प्रेमळ माणसं कुठंच नाहीत, तुम्ही डोक्यावर घेतलं नसतं तर... नेमकं काय म्हणाले अशोक सराफ
ज्या भूमीत मी कामाला सुरुवात केली त्या कोल्हापूर (Kolhapur) भूमीत माझा सत्कार होतोय याचा मला खूप आनंद असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केले.
Ashok Saraf : ज्या भूमीत मी कामाला सुरुवात केली त्या कोल्हापूर (Kolhapur) भूमीत माझा सत्कार होतोय याचा मला खूप आनंद असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केले. नेत्यांची व्यासपीठावर लढाई चालू होती ती खतरनाक होती. इकडे असं बोलत असतील तर तिकडे कसं बोलत असतील. यांची भाषण ऐकून वाटतं हेच माझ्यापेक्षा चांगले विनोदी कलाकार आहेत. उदय सामंत असं विनोदी भाषण करतात हे पहिल्यांदाच ऐकलं असे सराफ म्हणाले. हे नेते असं आनंदी राहतात याच समाधान वाटतं असेही ते म्हणाले.
तुम्ही जर मला डोक्यावर घेतलं नसतं तर मी कुठंतरी पडदा ओढत बसलो असतो. कोल्हापूर सारखी प्रेमळ माणसं कुठंच पहिली नाहीत. आजही मला वाटतं की महिन्यातील 8 दिवस कोल्हापुरात येऊन रहावं. माझी कला कोल्हापूरकरांनी वाढवली हे मी कायम आठवणीत ठेवीन असे सराफ म्हणाले. माझ्याचं लोकांनी माझ्यात घरात केलेला हा सत्कार महत्वाचा आहे असे ते म्हणाले.
अभिनेत्याच्या पुरस्कार कार्यक्रमात नेत्यांच्या कोपरखळ्या
मी भोळा भाबडा आहे असं मुश्रीफांनी म्हणताच सतेज पाटील यांनी हात जोडले. भोळा भाबडा म्हणतात हाच मोठा विनोद (खुर्चीत बसूनच सतेज पाटील म्हणाले) मी आता काही जास्त बोलत नाही नाहीतर सतेज पाटलांवर टीका केली असं होईल असेही मुश्रीफ म्हणाले. विनोदी सिनेअभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार प्रदान कार्यक्रमात नेत्यांी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या. आम्ही दादा कोंडके आणि अशोक सराफ यांचे सिनेमे पाहत मोठे झालो. तुम्ही आम्हाला खळखळून हसवले त्यामुळे आमचे आयुष्य आणखी वाढल्याचे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. कारण हसण्याने माणसाचं आयुष्य वाढते असेही ते म्हणाले.
मंत्री उदय सामंत हेदेखील या कार्यक्रमाला याठिकाणी उपस्थित होते. कोल्हापुरात आल्यानंतर सर्वच पक्षाचे नेते व्यासपीठावर असतात. कोल्हापूर हे असं शहर आहे ज्या ठिकाणी अशोक सराफ यांच्यासाठी राजकीय चप्पला व्यासपीठाच्या खाली ठेवताात. तुम्ही पडद्यावरचे कलाकार आम्ही राजकारणातले कलाकार आहात आम्ही काय कमी कलाकार नाही आहोत. तुम्ही 3 तास मेकअप करता, आम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मेकअपमध्ये असतो. अनेक नेते झोपले तरी मेकअप काढत नाही असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. गिरीश महाजन महायुती संकटमोचक आहेत. तर या व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम पुढं नेण्याचं काम इथले गिरीश महाजन करतात.
महत्वाच्या बातम्या:



















