एक्स्प्लोर

वाहनधारकांना मोठा दिलासा, टोलवर UPI ने पेमेंट केल्यास होणार फायदा; फास्टटॅग न वापरणाऱ्यांसाठी नवा नियम

सध्याच्या नियमानुसार FAST टॅग ऐवजी रोख किंवा UPI ने टोल भरणाऱ्या वाहनधाराकांना सद्या टोल रकमेच्या दुप्पट टोल द्यावा लागत आहे.

मुंबई : केंद्र सरकारे फास्टटॅग बंधनकारक केल्यामुळे टोलनाक्यावरुन प्रवास करताना वाहनांच्या लागणाऱ्या रांगा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, फास्टटॅगमुळे (Fasttag) टोलप्लाझावरील व्यवहारातही गती आली आहे. मात्र, अद्यापही अनेक वाहनधारक फास्टटॅगचा वापरत करत नाहीत. त्यामुळेच, सरकारने फास्टटॅगवापरणाऱ्या वाहनधारकांकडून टोलच्या रक्कमेच्या दुप्पट आकारणी सुरू केली आहे. मात्र, आता ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या वाहनधारकांना आता या दुप्पट पेमेंटपासून मुक्ती मिळणार आहे. UPI (UPI) ने टोल (Toll) भरणाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून फास्ट टॅग नसेल तर आता UPI ने पेमेंट केल्यास दुप्पट टोल द्यावा लागणार नाही. तांत्रिक व्यवहार वाढवणे आणि युपीआय पेमेंटला प्रमोट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

सध्याच्या नियमानुसार FAST टॅग ऐवजी रोख किंवा UPI ने टोल भरणाऱ्या वाहनधाराकांना सद्या टोल रकमेच्या दुप्पट टोल द्यावा लागत आहे. मात्र, 15 नोव्हेंबरपासून केंद्र सरकारने या नियमांत बदल केला असून वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या नियमानुसार, UPI म्हणजे ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून टोल भरणाऱ्या वाहनधारकांना तर फक्त 25% जास्त टोल भरावा लागणार, यापूर्वी दुप्पट म्हणजे 100 रुपयांऐवजी 200 रुपये टोला द्यावा लागत असते, जो आता 15 नोव्हेंबरपासून 125 रुपये द्यावा लागेल. राज्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन गाड्या चालवणाऱ्या वाहनधारकांना UPI ने पेंमेंट केल्यास दिलासा मिळणार असून महाराष्ट्रातील NHAI च्या 96 टोल नाक्यांवर टोल देण्यासंदर्भातील नियमात सरकारने बदल केल्याने वाहनधारकांना याचा लाभ होणार आहे.

उदाहरणासह स्पष्टीकरण (Toll plaza fasttag example)

उदाहरण पाहायाचे झाल्यास, एखाद्या NHAI TOLL चे दर 100 असतील तर फास्ट टॅगद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला फक्त 100 रू द्यावे लागतील. मात्र, जर तुम्ही UPI किंवा कॅश मध्ये पेमेंट केलं तर तुम्हाला, दंडामुळे दुप्पट टोल भरावा लागू शकतो म्हणजे 200 रुपये. मात्र, केंद्र सरकारने आता डिजिटल पेमेंटला सपोर्ट करण्यासाठी आणि UPI प्रमोट करण्यासाठी वाहनधारकांना दिलासा दिला आहे. म्हणजे, आता तुम्ही जर UPI ने टोल भरणार असाल तर तुम्हाला फक्त 200 ऐवजी 125 रू भरावे लागणार आहेत, म्हणजे सरकारने जवळपास 75 रू कमी केले आहेत. त्यामुळे, फास्टटॅगवापरणाऱ्या वाहनधारकांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget