एक्स्प्लोर
Asaduddin Owaisi Plan Of Maharashtra: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर असदुद्दीन ओवेसींचा महाराष्ट्र प्लॅन काय?; 8 मुद्दे समजून घ्या!
Asaduddin Owaisi Plan Of Maharashtra: राज्यात पक्ष फोफावण्यासाठी असदुद्दीन ओवेसींनी रणनीतीच हाती घेतल्याचं दिसतंय. त्यासाठी मुस्लीम समाजातील युवकांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न आहे.
Asaduddin Owaisi
1/12

Asaduddin Owaisi Plan Of Maharashtra: एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रात पक्षाची पुनर्बांधणी हाती घेतल्याचं दिसतंय. राज्यात पक्ष फोफावण्यासाठी त्यांनी रणनीतीच हाती घेतल्याचं दिसतंय. त्यासाठी मुस्लीम समाजातील युवकांना आपल्या बाजूने खेचण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं दिसतंय.
2/12

कोल्हापुरातल्या इचलकरंजी इथल्या ओवेसेंच्या सभेला मुस्लीम युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी त्यांनी मला पाठिंबा दिलात तर मला जाब विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं वक्तव्य केलं होतं.
3/12

पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पक्षांना आतापर्यंत तुम्ही मतदान केलं. त्याचा किती फायदा झाला असा सवाल त्यांनी केला. केवळ आय लव्ह मोहम्मद म्हणून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांचं आचरण करायला हवं असं ओवेसी म्हणाले.
4/12

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ओवैसीचा महाराष्ट्र प्लॅन काय जाणून घ्या...
5/12

1. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर दौरे
6/12

2. पक्षाची ताकद असेल तिथं ताकदीने निवडणूक लढवणार
7/12

3. मुस्लिम तरुणांना आकर्षित करत पक्ष विस्तारावर भर
8/12

4. अन्य पक्ष सोबत येण्याची शक्यता धुसर असल्यानं स्वबळाचीच अधिक तयारी
9/12

5. कोल्हापूर, मिरज, मालेगाव,संभाजीनगर,अहिल्यानगर अशा मुस्लिम बहुल भागांत दौरे सभा
10/12

6. मुस्लिम समाजाने राजकीय नेतृत्व करावे अशी साद
11/12

7. 'प्रस्थापित पक्षांनी निराशा केली, मला आता सोबत द्या नंतर जाबही विचारा' असं थेट आवाहन
12/12

8. केवळ 'आय लव मोहम्मद' म्हणून चालणार नाही, विचाराचे आचरण करा असा सल्ला
Published at : 30 Sep 2025 11:58 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























