एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे पत्नीसोबत दुसऱ्यांदा 'बोहल्यावर'
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/6dea6ee4a0c286701eed1a96f5cf6d53_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अकोला
1/10
![अकोल्यात एक 'हटके' लग्नसोहळा पार पडलाय. या लग्नात नवरदेव-नवरीच्या मुलांसह नातूही वरातीत थिरकलेत.. यातील नवरदेव 68 वर्षांचा तर नवरी 58 वर्षांची.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/e533f5c9943e34426358d97c2807121cb9919.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अकोल्यात एक 'हटके' लग्नसोहळा पार पडलाय. या लग्नात नवरदेव-नवरीच्या मुलांसह नातूही वरातीत थिरकलेत.. यातील नवरदेव 68 वर्षांचा तर नवरी 58 वर्षांची.
2/10
![वर चि. गुलाबराव आणि वधू चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी आशाताई. हळद, मेहंदी, वरात, मंगलाष्टके अन् जेवणावळी असं सारं काही या लग्नात होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/27af1c186a28d99bbee90143f32184667933f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर चि. गुलाबराव आणि वधू चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी आशाताई. हळद, मेहंदी, वरात, मंगलाष्टके अन् जेवणावळी असं सारं काही या लग्नात होतं.
3/10
![वधू-वर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आयुष्यात हा योग दुसऱ्यांदा आला होता. अन् तोही तब्बल 41 वर्षांनी. या दांपत्याचं लग्न झालं होतं 11 मे 1981 मध्ये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/225fe09ba22bb08fa8004400951a5a06c838e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वधू-वर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आयुष्यात हा योग दुसऱ्यांदा आला होता. अन् तोही तब्बल 41 वर्षांनी. या दांपत्याचं लग्न झालं होतं 11 मे 1981 मध्ये.
4/10
![गुलाबराव गावंडे हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री आहेत. बुधवारी त्यांच्या लग्नाचा 41 वा वाढदिवस होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/2ab05b96a780e7f1ce4c8033874e858998de0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाबराव गावंडे हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री आहेत. बुधवारी त्यांच्या लग्नाचा 41 वा वाढदिवस होता.
5/10
![गुलाबराव गावंडे अन् पत्नी आशाताई लग्नाच्या तब्बल 41 वर्षांनी परत बोहल्यावर चढले. हे सारं घडवून आणलं होतं त्यांचे मुलं, मुली, नातू, नातेवाईक आणि आप्तेष्टांनी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/d9ac2a2975ab8691bea5269e8e978b68404fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाबराव गावंडे अन् पत्नी आशाताई लग्नाच्या तब्बल 41 वर्षांनी परत बोहल्यावर चढले. हे सारं घडवून आणलं होतं त्यांचे मुलं, मुली, नातू, नातेवाईक आणि आप्तेष्टांनी.
6/10
![अकोल्यातील हिंगणा रोडवरच्या गुलाबराव गावंडे यांच्या आश्रमात हा 'शाही' विवाहसोहळा पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/0a145cfe4f7dc2ea244e45b73f59e48c2422c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अकोल्यातील हिंगणा रोडवरच्या गुलाबराव गावंडे यांच्या आश्रमात हा 'शाही' विवाहसोहळा पार पडला.
7/10
![लग्नमंडपात मंगलाष्टकं सुरू असतांना गुलाबराव आणि आशाताईंच्या डोळ्यांसमोरून आयुष्यातील संघर्ष अन आनंदांच्या आठवणींचा पट झरझर सरकत होता. अंगावर अक्षता पडत असतांना अनेकदा त्यांचे डोळे पाणावले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/e6be135df4aa37fc483a35ac95aa62f8be0ea.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नमंडपात मंगलाष्टकं सुरू असतांना गुलाबराव आणि आशाताईंच्या डोळ्यांसमोरून आयुष्यातील संघर्ष अन आनंदांच्या आठवणींचा पट झरझर सरकत होता. अंगावर अक्षता पडत असतांना अनेकदा त्यांचे डोळे पाणावले होते.
8/10
![लग्नाच्या आधी घोड्यावरून गुलाबरावांची भव्य वरात काढण्यात आली. या वरातीत गुलाबरावांच्या परिवारासह मित्र आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/7c8b842b3add332bd71610d8094c6c8dcd667.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नाच्या आधी घोड्यावरून गुलाबरावांची भव्य वरात काढण्यात आली. या वरातीत गुलाबरावांच्या परिवारासह मित्र आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
9/10
![गुलाबराव गावंडेंनी सक्रिय राजकारणातून बाजूला होत घरातील नव्या नेतृत्वाला पुढं केलं आहे. अनेक संघर्ष पचवलेल्या या नेत्यासाठी कालचा दिवस मात्र सर्वार्थानं वेगळा होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/c0d313feffc98e8fc672bd01b8c506d2256e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाबराव गावंडेंनी सक्रिय राजकारणातून बाजूला होत घरातील नव्या नेतृत्वाला पुढं केलं आहे. अनेक संघर्ष पचवलेल्या या नेत्यासाठी कालचा दिवस मात्र सर्वार्थानं वेगळा होता.
10/10
![अलिकडे नात्यांचे बंध आणि विण सैल होतांना दिसते आहे. सध्याच्या वृद्धाश्रम संस्कृतीत गुलाबराव गावंडेंचा हा लग्नसोहळा इतर मुलांना आई-वडिलांवर प्रेम करण्याचा संदेश देणारा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/d41de37db7742084c93e6df06421a9f502dfc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलिकडे नात्यांचे बंध आणि विण सैल होतांना दिसते आहे. सध्याच्या वृद्धाश्रम संस्कृतीत गुलाबराव गावंडेंचा हा लग्नसोहळा इतर मुलांना आई-वडिलांवर प्रेम करण्याचा संदेश देणारा आहे.
Published at : 12 May 2022 11:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
भविष्य
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)