एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik Rain Damage : भिंत खचली, चूल विझली...अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नाशिकमधल्या अभेटी गावाची दैना
नाशिकच्या पेठ तालुक्यातील अभेटी हे अवघे चारशे ते पाचशे लोकवस्तीचे गाव आहे. मात्र मागील तीन दिवसांच्या पावसात जवळपास पन्नासहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
![नाशिकच्या पेठ तालुक्यातील अभेटी हे अवघे चारशे ते पाचशे लोकवस्तीचे गाव आहे. मात्र मागील तीन दिवसांच्या पावसात जवळपास पन्नासहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/6ad61edd8ae546bd18d2f99d24f91b5b168128213320483_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Rain Damage
1/9
![गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/61b070bc4b68295dff6bfb23ec24e8d59e39a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.
2/9
![जिल्ह्यातील देवळा, चांदवड, सिन्नर, बागलाण, पेठ आदी तालुक्यात प्रचंड प्रमाणात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/4ebbfd2074a24b03d50a199b898f5e49b90fd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्ह्यातील देवळा, चांदवड, सिन्नर, बागलाण, पेठ आदी तालुक्यात प्रचंड प्रमाणात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.
3/9
![यात पेठ तालुक्यातील अभेटी, आमलोन, बरडापाडा, शेवखंडी आदी परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/77b7f05d64475625e7f194bd8547445185f78.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात पेठ तालुक्यातील अभेटी, आमलोन, बरडापाडा, शेवखंडी आदी परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले.
4/9
![अभेटी गावात सोमवारी (10 एप्रिल) सायंकाळी तासभर झालेल्या अवकाळी पावसाने गावातील घरांचे अतोनात नुकसान केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/886fb9fef5e7323588b7966c6602a4872154f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभेटी गावात सोमवारी (10 एप्रिल) सायंकाळी तासभर झालेल्या अवकाळी पावसाने गावातील घरांचे अतोनात नुकसान केले आहे.
5/9
![अवकाळी पावसाबरोबर गारपीट प्रचंड झाली. गारांचे गोळेच्या गोळे घरांवर कोसळत होते. अनेक घरांची कौल फुटली, अनेक घरांचे पत्रे उडाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/2bad31da004c4d9946ac45092fe4ce48f6de0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अवकाळी पावसाबरोबर गारपीट प्रचंड झाली. गारांचे गोळेच्या गोळे घरांवर कोसळत होते. अनेक घरांची कौल फुटली, अनेक घरांचे पत्रे उडाली.
6/9
![वादळी वाऱ्यासह मोठंमोठ्या गारा घरावर बरसू लागल्या. एवढ्या गारा पडू लागल्या की कौलांमधून पाणी घरात गळू लागले. त्यामुळे कुठे लपावं हे सूचत नव्हतं, अशी प्रतिक्रिया गावकऱ्याने दिली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/f2a084bf97e138dccd1aff48e3a6e4227e74f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वादळी वाऱ्यासह मोठंमोठ्या गारा घरावर बरसू लागल्या. एवढ्या गारा पडू लागल्या की कौलांमधून पाणी घरात गळू लागले. त्यामुळे कुठे लपावं हे सूचत नव्हतं, अशी प्रतिक्रिया गावकऱ्याने दिली
7/9
![पेठ तालुक्यातील अभेटी हे अवघे चारशे ते पाचशे लोकवस्तीचे गाव आहे. मात्र मागील तीन दिवसांच्या पावसात जवळपास पन्नासहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/1b972f42c4a05850e53a4db1a2a18af6623e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पेठ तालुक्यातील अभेटी हे अवघे चारशे ते पाचशे लोकवस्तीचे गाव आहे. मात्र मागील तीन दिवसांच्या पावसात जवळपास पन्नासहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
8/9
![यात कुणाच्या घराचे पत्रे उडाले, कुणाची कौलं फुटली, आंब्याची बागच झोडपून काढली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/2be4394660802553d2491b3846e7865867acb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात कुणाच्या घराचे पत्रे उडाले, कुणाची कौलं फुटली, आंब्याची बागच झोडपून काढली.
9/9
![कालपासून गावातील मंडळी पावसात नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती करण्यात व्यस्त आहेत मात्र आज, उद्याही पाऊस झाल्यास आम्ही जाणार कुठे असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/12/cbebc0750a2bde61d1e9735fab68e2644fa13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कालपासून गावातील मंडळी पावसात नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती करण्यात व्यस्त आहेत मात्र आज, उद्याही पाऊस झाल्यास आम्ही जाणार कुठे असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
Published at : 12 Apr 2023 12:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)