Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
मुंबई : गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची (Mumbai Neelkamal Boat Accident) घटना मुंबईत घडली. या बोटीत सुमारे 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झालं आहे. या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एलिफंटाकडे जात असताना उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट बुडाल्याची माहिती आहे. स्पीड बोटेने राऊंड मारला आणि समोरून धडक दिलीया अपघाताची दृश्य ही कॅमेरात कैद झाली आहेत. त्यामध्ये एक स्पीड बोट ही आधी मोठा राऊंड मारताना दिसत आहे. नतंर ही स्पीड बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक मारते. त्यामुळेच हा अपघात झाला आहे. धडक मारणारी ही स्पीड बोट इंडियन नेव्हीची असल्याचं सांगितलं जातंय. ही बोट नेव्हीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडियन नेव्हीकडून त्याची चौकशी सुरू झाली आहे.