एक्स्प्लोर

Travel BLOG: रोड ट्रिप कशी 'प्लॅन' करावी?

>> अमेय चुंभळे, ABP माझा प्रतिनिधी 

सर्व प्रवास आणि कारप्रेमींना नमस्कार! मी नुकतीच राजस्थानच्या तीन शहरांची रोड ट्रिप पूर्ण करून परतलोय. एकूण 3,600 किमीचा प्रवास होता. याआधी देखील अनेक रोड ट्रिप्स केल्या आहेत. त्याच्या अनुभवावर, अशा ट्रिप्सचं प्लॅनिंग कसं करावं, याबद्दल काही टिप्स शेअर करतोय.

1. मार्ग ठरवा

किती ठिकाणं करायची आहेत ते आधी नक्की करा. एका दिवसांत (सकाळ ते संध्याकाळ) जवळपास 450 ते 600 किमीचा प्रवास पूर्ण करता येतो. महत्त्वाचं म्हणजे (खासकरून कार चालवणाऱ्यांना) पुरेशी झोप मिळेल असंच प्लॅनिंग करा. वाटेत घाट असेल तर तो पार करण्यासाठी गुगल मॅप सांगतो त्यापेक्षा किमान दीडपट वेळ लागतो हे ध्यानात असू द्या.

2. हॉटेल बुक करा

मी कधीही ऐन वेळेला हॉटेल बुकिंग करत नाही. बुकिंग डॉट कॉम किंवा अगोडा सारख्या वेबसाईट्सवर हॉटेल्सचा बऱ्यापैकी अंदाज येतो. तिथं पर्याय पाहिल्यावर त्याचे रिव्ह्यूज गुगलवर देखील पाहा, आणि मगच बुकिंग करा. बहुतेक हॉटेल अर्ध भाडं आधी भरण्यास सांगतात, तसं करण्यात काही हरकत नसावी.

3. बजेटचा अंदाज घ्या

एकूण हॉटेलचा खर्च, जेवण-चहा-कॉफीची बिलं, पेट्रोल, टोल, पर्य़टन स्थळांचं तिकीट, पार्किंग शुल्क, शॉपिंग इत्यादीवर किती खर्च होणार आहे याचा अंदाज घ्या, आणि पैशांची तरतूद करून ठेवा.

4. गाडी तयार करा

सर्वात महत्त्वाचा मुद्दा. रोड ट्रिप कधीच रामभरोसे करू नये. गाडीचं रीतसर सर्व्हिसिंग करून घ्या, टायर जुने झाले असतील तर नवे टाका. साधारणतः 50 हजार किमी पूर्ण झाल्यावर टायर बदलले पाहिजेत. एसी, ब्रेक पॅड, क्लच पॅड, गिअर बॉक्स तपासून घ्या. बॅटरी उत्तम स्थितीत आहे याची खातरजमा करा. पुढचे आणि मागचे दिवे देखील तपासा.

5. सोबत 'कॅश' ठेवाच

आजकाल यूपीआयमुळे कॅश बाळगण्याची सवय लोप पावत चालली आहे. मात्र रोड ट्रिपवर अचानक कॅशची गरज भासते. कधी पेट्रोल पंपावर नेटवर्क नसल्यानं पैसे ट्रान्सफर होत नाहीत, तर कुठल्या तरी पर्यटन स्थळाचं तिकीट कॅशनंच घ्यावं लागतं... अशा अनेक शक्यता असतात. त्यामुळे आठ ते दहा हजारांची कॅश जवळ ठेवा.

6. पर्यटन स्थळांची यादी करा

ज्या शहरांमध्ये आपण जाणार आहोत, तिथं काय पाहायचंय त्याची यादी आधीच तयार करा. गुगल मॅपवर ती ठिकाणी पाहा, आणि एकमेकांपासून जवळ असणारी ठिकाणं एका दिवशी करा, त्यानं बराच वेळ वाचतो. 

7. पुरेसं अन्न, पाणी गाडीत ठेवा

आपल्या रस्त्यांवर कधीही मोठी वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते, ज्य़ामध्ये निर्जन ठिकाणी काही तास अडकून पडायला होतं. म्हणूनच चिप्स, बिस्किटं, शेंगदाणे असे पदार्थ पुरेशा प्रमाणात घेऊन जा. तसंच, पाण्याचा साठा देखील जवळ हवा. आपात्कालीन स्थितीत आपल्या सहप्रवाशांसह अनोळखी प्रवाशांची मदत करता आली तर कधीही चांगलंच!

8. फास्टॅग रिचार्ज करून ठेवा

गुगल मॅपमध्ये मार्ग पाहताना टोल किती आहे, हे देखील कळतं. त्यानुसार ट्रिपवर असताना दररोज तेवढ्या रकमेचं फास्टॅग रिचार्ज करत राहा. पुरेसा बॅलेन्स नसेल तर टोलच्या दुप्पट रक्कम भरावी लागते.

9. हवामानाचा अंदाज घ्या

आपण जिथे जातोय तिथं पाऊस, थंडी, बर्फवृष्टी असणार आहे का याचा अंदाज घ्या, आणि त्यानुसार गरम कपडे किंवा पावसाळी बूट घेऊन जा. आपला देश आकारानं इतका मोठा आहे की अनेकदा अन्य राज्यांमध्ये पूर्णपणे वेगळं हवामान असतं. उदाहरणार्थ, चेन्नईत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाऊस पडतो.

10. औषधं नेण्यास विसरू नका

ताप येणं, सर्दी-खोकला, डोकेदुखी, पोट बिघडणं हे प्रकार कुणालाही कधीही होऊ शकतात. त्यासाठी डोलो, क्रोसिन, कॉम्बिफ्लॅमसारख्या गोळ्या आणि खोकल्याचं सिरप जवळ ठेवा. वेळेवर शोधाशोध करणं अनेकदा मनस्ताप देऊन जातं.

11. प्रवास पहाटे सुरू करा

मी हे नित्यानं करतो. कुठल्याही ठिकाणाहून पहाटे पाच ते सहापर्यंत निघालात तर पहिले तीन ते चार तास रस्ते मोकळे मिळतात, त्यामुळे बरंच अंतर पार करता येतं. 

महत्त्वाचे इतर ब्लॉग : 

Travel BLOG: रोड ट्रिप - लोंगेवाला युद्ध स्मारक आणि तनोट माता

Travel BLOG: 3600 किमी रोड ट्रिपमधले धडे!

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Santosh Deshmukh Beed Death: मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरेAjit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Santosh Deshmukh Beed Death: मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
Suhas Kande: छगन भुजबळांनी कितीही ढोंग केले तरी त्यांच्यात राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची हिंमत नाही: सुहास कांदे
ढोंगी, गद्दार, ओरिजनल भुजबळ असाल तर..., सुहास कांदे छगन भुजबळांना काय काय म्हणाले?
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
Embed widget