Fact Check : संभळच्या जामा मशिदीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Fact Check: सोशल मीडियावर जुन्या पोस्टमध्ये हिंदू देवी-देवतांच्या चार मूर्तींचे फोटो आहेत.चुकीचा दावा करत त्या सोशल मीडिय वर शेअर केल्या जात आहेत.
Fact Check : असत्य
व्हायरल पोस्टची पडताळणी केली असता तीन मूर्ती संभळमधी नसून कर्नाटकमध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये रायचूरमध्ये सापडलेल्या आहेत. एक फोटो ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन घेण्यात आला आहे.
दावा नेमका काय?
सोशल मीडियावर चार फोटोंचा एक कोलाज व्हायरल होत आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेशच्या संभळमधील मुघलकालीन मशिदीच्या सर्व्हेक्षणात 1500 वर्षे जुन्या मूर्ती मिळाल्याचा दावा केला जात आहे. कोलाजमध्ये शिवलिंग, विष्णूच्या दोन मूर्ती आणि सुदर्शन चक्र अशी एक वस्तू दिसून येते.
फेसबुकवरील एका यूजरनं तेलुगु भाषेत कॅप्शन शेअर करत म्हटलं की संभळमध्ये मशिदीच्या सर्वेक्षणात 1500 वर्ष जुनी विष्णू मूर्ती, सुदर्शन चक्र आणि हिंदू मूर्ती सापडली आहे. ही पोस्ट प्रत्येक हिंदूनं शेअर केली पाहिजे, हिंदू धर्म वाचवला पाहिजे. यासारख्या पोस्ट आर्काइव्हवर पाहू शकता.
पडताळणी
या पोस्ट उत्तर प्रदेशातील संभळमधील मुघलकालीन शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाच्या संदर्भातील एका न्यायालयाच्या आदेशानंतर करण्यात आला आहे. ज्यानंतर हिंसाचाराच्या घटना घडला. एका स्थानिक न्यायालयानं एका याचिकेवर सुनावणी करत सर्वेक्षणाचा आदेश दिला होता. याचिकेत असा दावा करण्यात आला होता की जितं मशिद आहे तिथं एक हिंदू मंदिर होतं.
मात्र, सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या पोस्टमधील मूर्ती या संभळमधील मशिदीत सापडलेल्या नाहीत. फोटोत दिसणाऱ्या तीन मूर्ती या फेब्रुवारी 2024 मध्ये कर्नाटकमध्ये सापडल्या होत्या.तेव्हा तर मशिदीच्या सर्वेक्षणाचं प्रकरण देखील नव्हतं आलं.
सत्य कसं समोर आलं?
व्हायरल कोलाजमधील फोटो रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर एनडीटीवीची अर्काइव्ह लिंक 7 फेब्रुवारी 2024 च्या दिवसाची एक एक्स पोस्ट सापडली. त्याच्या कॅप्शनमध्ये कर्नाटक मध्ये नदीच्या किनाऱ्यावर पुरातन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग आढळल्याचा उल्लेख होता. व्हायरल केले जाणारे ते फोटो कर्नाटकमधील असल्याचं स्पष्ट होतं.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टमध्ये 6 फेब्रुवारी 2024 ला कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील शक्तीनगर क्षेत्रात कृष्णा नदी काठावर 1 हजार वर्ष जुनी विष्णू मूर्ती आणि शिवलिंग सापडल्याचा उल्लेख होता. रिपोर्टमध्ये हे देखील सांगण्यात आलं होतं की पुलाचं बांधकाम करताना सापडलं होतं. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या.
हे फोटो फेब्रुवारी 2024 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया आणि स्थानिक वृत्तवाहिनी टीव्ही 9 कन्नडच्या रिपोर्टमध्ये देखील प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळं व्हायरल होत असलेले फोटो संभळच्या मशिदीतील नसल्याचं स्पष्ट होतं.
लॉजिकली फॅक्ट्सनं रायचूरमधील कर्नाटकच्या पुरातत्त्व विभागाच्या इनचार्जशी चर्चा केली. या विष्णू मूर्ती आणि शिवलिंग रायचूरमधील असेल.
याशिवाय कोलाजमधील चौथा फोटो देखील कुठला आहे हे स्पष्ट झालं. गोलाकार चक्र सुदर्शन चक्र असल्याचं सांगण्यात आलं. इंडिया मार्ट नावाच्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर उपलब्ध आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं की मटेरियल : पितळेचं सुदर्शन चक्र कलशम, मंदिर, वेबसाइटनुसार मटेरियल हैदराबाद येथील कोलचरम आर्ट क्रिएशननकडून विक्री होती.
इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की संभळ मशिदीचा पहिला सर्व्हे 19 नोव्हेंबर 2024 ला करण्यात आला होता. मूर्ती त्याच्या काही महिन्यांपूर्वी आढळल्या होत्या.
निर्णय
कर्नाटकमध्ये आढळलेल्या तीन मूर्ती आणि ई कॉमर्स वेबसाईटवरील एक फोटो चुकीच्या पद्धतीनं दावा करत शेअर केला जात आहे.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा लॉजिकली फॅक्टस वर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]