Zero hour Guest Center : अमित शाह 90 मिनिटांच्या भाषणात त्या 12 सेकंदात काय बोलले?
Zero hour Guest Center : अमित शाह 90 मिनिटांच्या भाषणात त्या 12 सेकंदात काय बोलले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे मी केलेले वक्तव्य हे तोडून-मोडून दाखवण्यात आलं, काँग्रेसने वस्तुस्थितीचा विपर्यास केला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. ज्या काँग्रेसने आतापर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान केला त्याच काँग्रेसने हे कृत्य केल्याचा आरोप अमित शाहांनी केला. संविधानाचा आणि बाबासाहेबांचा सन्मान करणाऱ्या पक्षात मी काम करतो असं अमित शाह म्हणाले. अमित शाहांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने टीका केली होती. त्यावर अमित शाहांनी प्रत्युत्तर दिलं.
अमित शाह म्हणाले की, "काँग्रेसने ज्या प्रकारे माझ्या वक्त्यव्याचा विपर्यास केला आहे, मी त्याचा निषेध करतो. काँग्रेस हा संविधान विरोधी पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच न्यायव्यवस्थेचा अवमान केला आहे. देशात आणीबाणी लागू केली. संसदेत हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर आता खोटं पसरवण्याची तीच जुनी पद्धत काँग्रेसने सुरू केली. काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव करण्याचे काम केले. त्यांना भारतरत्न मिळू नये यासाठी प्रयत्न केले गेले. पण देशात काँग्रेसची सत्ता नसताान आंबेडकरांना भारतरत्न मिळाले."