एक्स्प्लोर
Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला; पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर येण्याची चिन्हे
Kolhapur Rain Update: यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले. त्यामुळे भोगावती नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.
Kolhapur Rain Update:
1/10

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे
2/10

त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
3/10

सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फूट पाच इंच इतकी आहे.
4/10

आणखी एक फूट पाणी पातळी वाढल्यास पंचगंगा पुन्हा एकदा पात्राबाहेर पडू शकते.
5/10

घाटमाथ्यावर पावसाचा जोर प्रचंड आहे, त्यामुळेच राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
6/10

यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले.
7/10

त्यामुळे भोगावती नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.
8/10

जिल्हा प्रशासनाने भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
9/10

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याने सुमारे 32 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
10/10

अलमट्टी धरणातून पाण्याचा 1 लाख 25 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे.
Published at : 18 Aug 2025 11:36 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















