एक्स्प्लोर
Hemant Patil : वक्तृत्व स्पर्धा जिंकणाऱ्या तब्बल 50 विद्यार्थ्यांना घडवली दिल्लीवारी; खासदार हेमंत पाटील यांचा अनोखा उपक्रम
Delhi : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना दिल्लीवारी घडवली आहे.

Delhi
1/7

एरव्ही राजकीय नेत्यांच्या अभ्यासदौऱ्यांची चर्चा असते, पण राजधानी दिल्लीत सध्या एका खासदारांच्या पुढाकारानं निघालेल्या विद्यार्थ्यांच्या दौऱ्याची चर्चा आहे.
2/7

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी जिल्ह्यात वर्कृत्व आणि निबंध स्पर्धा आयोजित करत यामधील विजेत्यांनी अनोखी दिल्लीवारी घडवली आहे.
3/7

संसद भवनासह दिल्लीतल्या अनेक महत्वाच्या वास्तूंना भेट देण्याचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांना मिळाला.
4/7

सातवीपासून ते महाविद्यालयाच्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होती. यातल्या अनेकांसाठी हा पहिलाच दिल्ली अनुभव होता.
5/7

या विद्यार्थ्यांना दिल्लीतल्या मराठी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधीही यानिमित्तानं मिळाली.
6/7

हे सर्व विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतले आहेत. त्यामुळे ज्या परिस्थितीतून आपण संघर्ष करत वर आलो, त्याची जाणीव ठेवून या विद्यार्थ्यांनाही वेगळे अनुभव घेण्याची, समृद्ध होण्याची संधी मिळावी यासाठी ही दौऱ्याची कल्पना अमलात आणल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलं.
7/7

यावेळी दरवर्षी ही संकल्पना राबवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Published at : 28 Dec 2022 06:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
