Pune Crime Swargate St depot | स्वारगेट बस स्टॅण्डमधील बलात्काराचं प्रकरण नक्की काय?
Pune Crime Swargate St depot | स्वारगेट बस स्टॅण्डमधील बलात्काराचं प्रकरण नक्की काय?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
25 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी पहाटे साडे पाच वाजता 26 वर्षांची एक तरुणी पुण्यातील या स्वारगेट बस स्थानकामध्ये आली. ही तरुणी पुण्यातील एका हॉस्पिटल मध्ये काउन्सलिंगच काम करते मात्र तिच कुटुंब फल्टन परिसरातील तिच्या मूळ गावी वास्तव्याला आहे आणि या तिच्या कुटुंबाकडे जाण्यासाठी तिला या स्वारगेट बस स्थानकातून फल्टन साठी एसटी बस हवी होती. इथे आल्यानंतर तिला. अनेक एसटी बस दिसल्या, मात्र फल्टनला जाणाऱ्या एसटी बसचा बोर्ड त्यावरती नव्हता. तिने चौकशी सुरू केली तेव्हा एका व्यक्तीने ही जी बस आहे MH06 BW03 19 या क्रमांकाची ही बस फल्टनला जाईल असं या 26 वर्षांच्या तरुणीला सांगितलं आणि त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून ही तरुणी या बसमध्ये चढली. आलेली आहे आणि आता इथून पुन्हा ही बस स्वारगेटहून सोलापूरला जाणार आहे असं या तरुणीला त्या व्यक्तीने सांगितलं आणि स्वार्गेटहून सोलापूरला ही बस जात असताना फल्टन मार्गे जाते आणि त्यामुळं आपल्याला फल्टनला आपल्या गावी पोहोचता येईल असं या तरुणीला वाटलं आणि त्यामुळे ही तरुणी या बसच्या आतमध्ये चढली आणि पाठोपाठ ज्या व्यक्तीने या तरुणीला बसच्या आतमध्ये चढायला सांगितलं होतं. ती व्यक्ती देखील आतमध्ये चढली, ज्या व्यक्तीने या तरुणीला आतमध्ये जायला सांगितलं होतं, ती व्यक्ती होती पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे, ज्या दत्तात्रय गाडे वरती या आधी चोरी आणि चेन सचिंग सारखे गंभीर गुन्हे पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्थानकामध्ये दाखल आहेत, शिरूर पोलीस ठाण्यामधला हा सराईत गुन्हेगार जामीन मिळून. या स्वारगेट परिसरामध्ये वावरत होता, एखार्थानी सावज हेरत होता आणि त्याला सावज भेटलं, 26 वर्षांची ही बिचारी तरुणी, ज्या तरुणीने या दत्तात्रय गाडेवरती विश्वास ठेवून या बसमध्ये ती चढली, तिला अपेक्षा होती, बस सुरू होईल आणि तिच्या कुटुंबाकडे ती पोहोचेल, मात्र बाहेर जरी लोक असले तरी बस मध्ये ही तरुणी एकटी आहे हे ओळखून दत्तात्रय गाडेनी तिच्यावरती अत्याचार. केला, बलात्कार केला आणि या सगळ्या प्रकरणामुळे ही तरुणी मोठ्या धक्क्यामध्ये गेली, मोठा धक्का तिला बसला आणि त्यानंतर जेव्हा सकाळा प्रकार घडल्यानंतर दत्तात्रय गाडे या बस मधून उतरला, त्यानंतर ही तरुणी देखील उतरली, मात्र ती इतक्या धक्क्यामध्ये होती की याची माहिती ती आजूबाजूच्या कुठल्याही लोकांना सांगू शकली नाही, स्वारगेट पोलीस स्टेशन देखील इथून जवळच आहे, तिथे देखील जाण्याची ताकद किंवा... तिथे देखील जाण्याच भाण या तरुणीला राहिलं नाही. दुसरी एक बस तिने पकडली आणि ती तिच्या गावाकडे, तिच्या जवळच्या लोकांकडे जायला निघाली आणि जाताना मग फोनवरती तिने ही माहिती तिच्या जवळच्या लोकांना दिली आणि त्यानंतर मग तिच्या नातेवाईकांनी, तिच्या जवळच्या लोकांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती पुणे पोलिसांना दिली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि सराईत गुन्हेगार असलेल्या दत्तात्रेय गाडेचा शोध सुरू केला. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न तो म्हणजे पुण्यातील स्वार्गेट सारख्या नेहमी वरदळ असलेल्या ठिकाणी पहाटे बरोबर मधोमध असलेल्या बस मध्ये एका तरुणीवरती बलात्कार करण्याच धाडस एक सराईत गुन्हेगार करू शकतो आणि याचमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. हा सराईत गुन्हेगार किती नामचीन आहे किंवा? किती धोकादायक आहे याची माहिती जर पोलिसांना होती तर तो असा या सार्वजनिक ठिकाणी वावरतो आहे याची माहिती देखील पोलिसांना मिळणं आणि तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई होणं अपेक्षित होतं जी झाली नाही आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला. मुलगी बिचारी म्हणावी लागेल कारण तिने एका अनोळखी व्यक्तीवरती विश्वास ठेवला अर्थात हा विश्वास असा ठेवावा का किंवा? नाही अशी तिला अपेक्षा असेल तिच्याही नकळत मात्र हा प्रसंग घडला, तिच्यावरती बलात्कार झाला आणि यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुण्यामध्ये किती गंभीर बनलाय हे पुन्हा एकदा समोर आल.























