बंगालच्या खाडी परिसरात चक्रीवादळसदृश्य परिस्थिती पाहता हवामान खात्यानं ओडिशा येथील किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
2/5
'यास' (Yaas ) हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्यास प्रशासनाला पूर्ण तयारीनिशी संकटाशी दोन हात करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
3/5
पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये या चक्रीवादळाच्या तीव्रतेसंदर्भातील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. हे संभाव्य संकट पाहता प्रशासन भारतीय नौदलाशी समन्वय साधत असल्याची माहिती समोर आली आहे.
4/5
सध्याच्या घडीला चक्रीवादळाचा इशारा पाहता इथं एनडीआरएफची 17 पथकं, ओ़डीआरएफच्या 20 बटालियन आणि फायर सर्विसच्या 100 तुकड्या बचावकार्यासाठी तैनात असल्याचं कळत आहे.
5/5
हवामान खात्यानं दिलेल्या पूर्वसुचनेनुसार 26 मे पर्यंत सकाळच्या सुमारास हे चक्रीवादळ ओडिशा- पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकू शकतं. ज्यामुळं या भागात मासेमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.