एक्स्प्लोर
PHOTO : समृद्धी अपघात, पालकमंत्री भुमरेंकडून पाहणी; अपघाताची होणार चौकशी
Samriddhi Highway Accident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाका भागातील समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

Minister Sandipan Bhumre
1/8

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा झालेला अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एकूण 23 जण यात जखमी झाले आहेत.
2/8

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी अपघातास्थळी जाऊन पाहणी केली.
3/8

यावेळी पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी अपघाताची माहिती पालकमंत्री भुमरे यांना दिली.
4/8

ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा नेमका अपघात कसा झाला, याबाबत देखील पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी पालकमंत्री भुमरे यांना माहिती दिली.
5/8

यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे देखील उपस्थित होते. सावे यांनी सुद्धा अपघातास्थळाची पाहणी केली.
6/8

विशेष म्हणजे सकाळीच घाटी रुग्णालयात भेट देऊन सावे यांच्याकडून जखमींची विचारपूस करण्यात आली. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
7/8

दरम्यान, त्यानंतर पालकमंत्री भुमरे आणि मंत्री सावे यांनी अपघात स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून जखमींना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.
8/8

तसेच या अपघाताची संपुर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. तसेच जो कोणी दोषी असेल त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती भुमरे यांनी दिली आहे.
Published at : 15 Oct 2023 02:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion